शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ बंदच्या दुसऱ्या दिवशीही नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:57 IST

ठिकठिकाणी लागले दुकान

जळगाव : सम-विषम पद्धत बंद करीत सर्व दुकानांसह व्यापारी संकूलही सुरू करण्यास परवानगी देताना शनिवार व रविवार बाजारपेठ बंद करण्याचे आदेश असले तरी याच्या अंमलबजावणीच्या दुसºया दिवशी रविवार, ६ सप्टेंबर रोजीदेखील शहरात नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र होते. यामध्ये महात्मा फुले मार्केट समोर तसेच वेगवेगळ््या ठिकाणी कापड, चप्पल विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. या सोबतच मास्क न वापरता शहरात फिरणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असलेल्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले. यामध्ये शहरातील व्यापारी संकूलही बंद होते. त्यानंतर व्यापारी संकूल वगळता इतर दुकाने सम-विषम विषम पद्धतीने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली व नंतर व्यापारी संकूलही सुरू झाले. त्यात गेल्या आठवड्यात ३१ आॅगस्टपासून सम-विषम पद्धत बंद करीत सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता शनिवार व रविवार वगळता इतर दिवस दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यात आली. यात शनिवार व रविवार केवळ जीवनावश्यक वस्तूंच्याच दुकाना सुरू राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिले.असे असतानाही गेल्या दोन दिवसांपासून शहरात हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र आहे. एरव्ही सुरुवातीपासूनच रविवारी शहरातील बहुतांश दुकाने बंदच असतात. त्यामुळे बाजारपेठेत कोणी येत नाही. मात्र सध्या नियम ठरवून दिल्यानंतर आलेल्या रविवारी व्यापारी संकुलांमधील दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या इतर दुकाना बंद असताना महात्मा फुले मार्केट समोर, अजिंठा मार्गावर, शहरातील वेगवेगळ््या परिसरात कापड, चपला, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटून व्यवसाय सुरू ठेवला.शनिवारीदेखील असेच चित्र शहरात विविध भागात होते. दोन दिवसांपासून रस्त्यावर दुकाने थाटली जात असली तरी मनपाच्या पथकाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बाजारपेठ बंद असताना वर्दळ कायमकोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा म्हणून दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय असला तरी बाहेर फिरणाºयांची गर्दी काही कमी झाली नाही. बाजारपेठ बंद असल्याने काय खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले, असा सवालही उपस्थित केला जात आहे.मास्कचा वापर करण्यास टाळाटाळमास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला असून मास्क न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी शहरात अनेक जण अजूनही मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. रविवारीदेखील शहरात अनेक वाहनधारक विनामास्क फिरत असल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना रोखत कारवाई केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव