शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

दादा भाऊबीजेला साडी आणि भेटवस्तू दिली नाही तरी चालेल, फक्त या बहिणींची सुखदुखात आठवण ठेवा” आरोग्यसेविकांनी काढले भावनिक उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 14:56 IST

आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, नर्सेस आदी १३०० आरोग्यसेविका यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे स्नेहवस्त्र म्हणून साडी, मिठाई व कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देण्यात आले.

ठळक मुद्दे चाळीसगाव तालुक्यातील १३०० आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, नर्सेस यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे साडी व मिठाई वाण व कोरोना योद्धा सन्मानपत्र वाटपचाळीसगाव येथे भाऊबीजेच्या निमित्ताने भाजप व शिवनेरी फाऊंडेशनतर्फे कोरोना काळात सेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांचा गौरव सोहळाआरोग्यसेविकांच्या मेहनतीनेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास यश, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा भाऊ म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करणार – आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगाव : गरीब श्रीमंतीच्या वादातून भाऊ बहिणींच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अनेक बहिणी यांना भाऊ असूनदेखील ते भाऊबीज साजरी करत नाहीत. गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही कोरोनासारख्या आजाराशी लढत आहोत, मात्र या काळात आमची कुणालाही आठवण आली नाही. मात्र मंगेश चव्हाण हे पहिले आमदार असतील ज्यांनी आम्हाला बहिण मानत भाऊबीज सोहळा घेतला. ज्यांना भावाची उणीव भासत असेल ती मंगेशदादांनी पूर्ण केली आहे. दादा, भाऊबीजेला साडी आणि भेट दिली नाही तरी चालेल, फक्त या बहिणींची सुखदुखात आठवण ठेवा, तुमच्या मदतीचा हात आमच्या पाठीशी ठेवा’,असे भावनिक उद्गार अंगणवाडी सेविका मीनाताई चौधरी यांनी काढले.आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाऊंडेशनमार्फत कोरोना काळात जीवाची पर्वा न करता घरोघरी सर्वेक्षण व आरोग्यसेवा देणाऱ्या विविध शासकीय यंत्रणेत अतिशय अल्प मानधन तत्वावर काम करणाऱ्या आरोग्यसेविका यांच्या सन्मानार्थ ‘भाऊबीज’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, नर्सेस आदी १३०० आरोग्यसेविका यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे स्नेहवस्त्र म्हणून साडी, मिठाई व कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर योगाचार्य चंद्रात्रे बाबा, महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे, नगरसेविका झेला पाटील, शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रेमचंद खिवसरा, उध्दवराव महाजन, नगरसेवक राजेंद्र चौधरी, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेविका विजया पवार, विजया पवार, माजी पं.स. सभापती दिनेश बोरसे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, जि.पं.सदस्य भाऊसाहेब जाधव, माजी मार्केट कमिटी सभापती सरदार राजपूत, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, सोमसिंग राजपूत, कोळी महासंघाचे अण्णा कोळी, फकीरा मिर्झा, बापू अहिरे, अंगणवाडी संघटनेचे रामकृष्ण पाटील, चिराग शेख, चंदू तायडे, आबा पाटील वाघडू, डॉ. देवराम लांडे, प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी, माजी पं.स. जगन महाजन, सरचिटणीस धनंजय मांडोळे, अंगणवाडी व आशा सेविकांचे-संघटनेचे पदाधिकारी, वाय.आर.सोनवणे, जगदीश सूर्यवंशी, सुनील पवार, भावेश कोठावदे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, चेतन देशमुख, विजय पाटील, अमोल चव्हाण, डॉ.रवींद्र मराठे, नीळकंठ मगर या नियोजनात मदत करणारे- अंगणवाडी मुख्य सेविका, आशा सेविका - गटप्रवर्तक व आरोग्य सेविका उपस्थित होते.
टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव