याबाबत भडगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
तालुक्यात २० ते २३ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात हजारो हेक्टरवरील केळी, लिंबू, फळ बागा व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. या नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. अजूनही शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नाही.
तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशा प्रकारचे निवेदन शेतकरी संघटनेच्यावतीने निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, संभाजी माळी, देविदास चित्ते, सरदारसिंग पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.
230921\23jal_2_23092021_12.jpg
भडगाव नायब तहसिलदार रमेश देवकर यांना निवेदन देताना अखिलेश पाटील, संभाजी माळी, संजय पाटील, देविदास चित्ते आदी.