शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

चार मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 13:15 IST

मालेगाव तालुक्यातून घेतले दोघांना ताब्यात

ठळक मुद्दे मुलीच्या सासरी जात असल्याचे सांगून पतीची केली दिशाभूल

जळगाव : सासरी असलेल्या मुलीला कपडे देऊन येते असे सांगून पतीची दिशाभूल करुन चार मुलांच्या आईने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे. १० दिवस तपास केल्यानंतर या महिलेला व तिच्या प्रियकराला बुधवारी पोलिसांनी मालेगाव तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका महिलेचे (वय ३६) तिच्या माहेरच्या गावाच्या शेजारी असलेल्या गावातील एकाशी (वय ४०) प्रेमप्रकरण बहरले होते. या महिलेला दोन मुली व दोन मुले अशी चार अपत्य आहेत. त्यापैकी दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. अनुक्रमे १४ व १० वर्षाचे दोन मुले व पतीसोबत ही महिला भडगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सुनील पाटील यांच्या शेतातील घरात राहत होती. पती हा पाटील यांच्याकडे सालदार म्हणून कामाला आहे. ८ आॅक्टोबर रोजी या विवाहितेने पतीजवळ येऊन सांगितले की, धुळे तालुक्यात दिलेल्या मुलीचा फोन होता. आपल्याकडे शिवण्यासाठी टाकलेले ब्लाऊज व इतर कपडे घेऊन ती मला तिच्या सासरी बोलवत असल्याने मी तेथे जात असल्याचे सांगून ही महिला त्या दिवशी घरातून गेली. पाच दिवस झाले तरी पत्नी अजून का येत नाही म्हणून पतीने पत्नीला फोन लावला, मात्र तो बंद येत होता. मुलीशी संपर्क केला असता आई माझ्याकडे आलीच नाही असे मुलीने सांगितल्यावर पतीला धक्काच बसला. त्यामुळे पतीने १३ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला पत्नी हरविल्याची तक्रार दिली.मालेगाव तालुक्यात थाटला संसारमहिला हरविल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मेहुणबारे पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शालिक कुंभार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याशी संपर्क केला. हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, चंद्रकांत पाटील यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर माहिती काढली असता या विवाहितेने दुसऱ्या फोनवरुन मुलीला फोन केला होता. त्यातून ही विवाहिता मालेगाव तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बुधवारी महिला राहत असलेले ठिकाण गाठले असता ती प्रियकरासोबत आढळून आली.विवाहिता पतीच्या स्वाधीनप्रियकराचे गाव हे महिलेच्या माहेर शेजारीच आहे. प्रियकराचेही लग्न झालेले असून त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगी लग्नाच्या वयाची आहे. प्रेमात आकंत बुडाल्याने दोघांनी पळून जावून संसार थाटला होता. दरम्यान, बुधवारी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आणल्यानंतर विवाहितेला पतीच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव