शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलचा निकाल येणार सर्वात आधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:10 IST

दुपारी २ पर्यंत येणार पहिला निकाल : जळगाव शहरासाठी सर्वाधिक २९ फेऱ्या; निकालाला ४ वाजणार

जळगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी संबंधीत तालुक्याच्या ठिकाणी होणार असून त्यासाठीची आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे. एरंडोल मतदार संघात सर्वात कमी उमेदवार व कमी फेºया असल्याने तेथील निकाल सर्वात आधी दुपारी २ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर जळगाव शहर मतदार संघासाठी २९ फेºया असल्याने अधिकृत निकाल येण्यास ४ वाजण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात सरासरी ६०.९० टक्के इतके मतदान झाले असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून याकरीता १२५४ अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.सकाळी ८ वा सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होणार असून त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित केलेल्या टेबलवर रँडमली निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. याकरीता १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई याप्रमाणे कर्मचारी असणार आहे.मतमोजणीसाठी आज प्रशिक्षणमतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षक व सहाय्यक यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरे प्रशिक्षण २३ आॅक्टोबर रोजी होणार आहे. प्रशिक्षणानंतर मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची सरमिसळ करुन कोणाला कोणत्या मतदार संघात मतमोजणीसाठी पाठवायाचे याचे आदेश संबंधितांना देवून त्यांना लगेचच मतमोजणी केंद्राकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मतदानकेंद्राच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.मतमोजणी होणार असलेली ठिकाणेचोपडा- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक २, चोपडा, रावेर - नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, रावेर, भुसावळ- प्रशासकीय इमार, प्रभाकर हॉलसमोर, भुसावळ, जळगाव शहर- महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोडवून क्रमांक २६, जळगाव, जळगाव ग्रामीण- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक २, धरणगाव, अमळनेर- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, प्रताप कॉलेज, अमळनेर, एरंडोल- डीडीएसपी कॉलेज, तरणतलावाजवळ, म्हसावद रोड, एरंडोल, चाळीसगाव- वायएन चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव, पाचोरा-गिरणाई क्रेडिट सोसायटी गोडावून क्रमांक ३, मोंढाळा रोड, पाचोरा, जामनेर- शासकीय खाद्यनिगम गोडवून क्रमांक ३, मार्केट कमिटीच्या पश्चिम बाजूला, जामनेर, मुक्ताईनगर-श्री संत मुक्ताबाई महाविद्यालय इनडोअर स्टेडियम, मुक्ताईनगर येथे होईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव