शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - आठाई एक अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:10 IST

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे ...

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे म्हणतात. आतापर्यंत १९९९, २००८, २०११ व २०१८ मध्ये आठाई केली. प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा आहे. तत्पूर्वी १९९२ साली मला माझ्या पूज्य सत्यनारायण गोयंका यांच्याकडून अंतर्मुख होण्याची कला, विपश्यना साधना प्राप्त झाली. १९९९ साली पहिली आठाई अनुभवली. ६ किलो वजन कमी झाले. केवळ दोनच दिवस कसे तरी काम करून पुढील ६ दिवस घरी आराम करूनच व्रताची सांगता झाली. २००८ मध्ये व्रतात माझी काम करण्याची क्षमता वाढली. यावेळी ४ दिवस काम करू शकलो. २०११ साली गांधी रिसर्च फाउंडेशन म्युझियमच्या निर्मितीचे काम करीत असताना तिसरी आठाई केली. माझे गुरुजैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्यामते आपल्या कामात मन लावून व्यग्र असणे हाच अध्यात्मिक प्रगती साधण्याचा मार्ग असल्यामुळे ते काम करणाऱ्या माणसाला इतके कठीण व्रत करण्यास कधीच उत्तेजना देत नसते. त्यामुळे त्यांना कळू न देताच मी आठ दिवसांची पचकावणी केली. माझी आठाई सुरु आहे, हे भवरलाल जैन यांना कळल्यावर पुढचे दोन दिवस घरीच रहावे लागले. यावेळी शरीरातील वेदनांकडे सातत्याने बघू शकलो हीच मी या व्रताची उपलब्धी मानतो. मन बºयापैकी शांत होते, काम करताना मन विचलित होत नव्हते. व्रत करूनही काम करण्याची क्षमता वाढल्याने एक वेगळा आत्मविश्वास आला. वय वाढत होते आणि त्याच्यासोबत येणाºया व्याधीही टाळता येणाºया नव्हत्या. २०१४ मध्ये हृदयाची समस्या होती. औषधोपचार सुरु होते. असे असतानाही सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आठही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नेहमी प्रमाणे काम करून हे व्रत पूर्ण केले. तेही एकही औषधाची गोळी न घेता. रक्तदाबही वाढला नाही. ही एक वेगळीच अनुभूती होती.- शिरीष बर्वे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव