शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

एस.पींच्या दराऱ्याने कर्मचारी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 19:09 IST

अंतर्गत शिस्त व अवैध धंद्यांना विरोध

सुनील पाटीलजळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुजू झाल्यापासून अंतर्गत शिस्त व अवैध धंद्यांना विरोध या दोन बाबींना प्राधान्य दिले आहे. दोन्ही निर्णय योग्य असले तरी अंतर्गत शिस्तीच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात येताना गणवेश व हेल्मेट सक्तीला बहुतांश अधिकारी व कर्मचाºयांचा विरोध आहे. कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असल्याने शिंदे यांच्यापर्यंत येऊन याबाबत कोणीही उघड बोलायला तयार नाही किंवा पोलीस अधीक्षकांना विरोध करण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नाही.महामार्गावर वापरताना हेल्मेट सक्ती एक वेळ चालेल, मात्र मुख्यालयात सक्ती म्हणजे अतिरेकच आहे. त्यामुळे अन्य भानगडीत न पडणारे कर्मचारीही कमालीचे धास्तावले आहेत. अवैध धंद्याच्या बाबतीत संबंधित अधिकारी व कर्मचारी दुखावले आहेत, परंतु त्याही पेक्षा जास्त कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेने सुखावले आहेत. धंदे बंदचा आव आणला जात असला तरी जिल्ह्यात धंदे सुरुच असल्याचे वेळावेळी झालेल्या कारवायांमधून सिध्द होत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आस्थापना, विभागीय चौकशी व इतर ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांची अडवणूक होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत तर आस्थापना विभागाने तर दुकानच मांडले होते. या सर्व दुकानदारांची दुकानदारीला शिंदे यांनी चाप लावला आहे. हा निर्णय कौतुकास्पद होत आहे. गणवेश व हेल्मेट सक्तीमुळे कर्मचारी कमालीचे तणावात आहेत.दुर्देवाने एखादी घटना अथवा दुर्घटना घडली तर त्याचे खापर नक्कीच पोलीस अधीक्षकांच्या नावाने फोडले जाईल, यात शंका नाही. तत्कालिन पोलीस उपअधीक्षक दिलीप शंकरवार यांच्याबाबतीत असाच प्रकार घडला होता. त्यांच्याबाबतील सामान्य नागरिक व कर्मचाºयांमध्ये प्रचंड रोष होता. शेतकरी मृत्यूप्रकरण त्यांच्यावर चांगलेच शेकले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी काही गोष्टींचा अतिरेक थांबविला पाहिजे असे मत काही कर्मचाºयांचे आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव