शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्‍यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:37 IST

सुप्रिया सुळे : विद्यापीठ कर्मचा-यांशी साधला व्हीडिओ कॉलद्वारे संवाद

जळगाव : महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन आयोग व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे प्रश्न‍ आठवडाभराच्या आत सुटण्याच्या दृष्टीने राज्याचे वित्त व नियोजन मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण राज्य मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यांच्यासह महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक येत्या दोन तीन दिवसात निश्चित करून प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सुटावे, यासाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शनिवारी व्हीडीओ कॉलवरून दिले.विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तिन्ही संघटनांच्या सदस्यांनी शनिवारी सलग तीसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ द्वारसभा घेऊन निदर्शने करीत शासनाच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष अभिषेक पाटील, अ‍ॅड कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे यांनी आंदोलनास पाठींबा दिल्याचे जाहीर केले. अभिषेक पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी व्हीडीओकॉलद्वारे करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले दोन शासन निर्णय पुनर्जिवित करणे, १०,२० व ३० वर्षांच्या सेवेनंतरची तीन लाभांची योजना लागू करण्यासंदर्भात वित्त, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री, सचिव व कृती समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक २९ किंवा ३० सप्टेबर रोजी आयोजित करण्याच्या संदर्भात त्यांनी वित्त मंत्र्यांच्या विशेष कार्यआधिकारी यांच्याशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाच्या पुर्ततेसाठी स्वत: अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी होईपर्यंत पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव