शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ पालिकेत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:05 IST

नगरपरिषद कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसातवा वेतन आयोग लागू करावारोजंदारी कर्मचाºयांना कायम करावेवसुलीची अट वगळून पालिकेस १०० टक्के अनुदान द्यावे

भुसावळ, जि.जळगाव : नगरपरिषद कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांसह सफाई कामगार सहभागी झाले.सातवा वेतन आयोग राज्यसरकारी कर्मचाºयांसह पालिका कर्मचाºयांना लागू करावा, रोजंदारी कर्मचाºर्यांना त्वरित कायम करावे, वसुलीची अट वगळून पालिकेस १०० टक्के अनुदान देण्यात यावे, २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वारस हक्काप्रमाणे अनुकपाधारकांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू खरारे, उपमुख्याधिकारी एस.जी.देशपांडे, कार्यालय अधीक्षक अख्तर खान, लेखपाल संजय बनाईते, कर अधीक्षक शेख परवेज अहमद, शेख रफिक, किरण मंदवाडे, अनवर शेख, प्रकाश कोळी, राजेश पाटील, देवीदास नेमाडे, श्याम गिरी, नरेंद्र पाटील, प्रमोद मेढेंसह सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.या आंदोलनात नगर परिषद कर्मचाºयांनी एकजूट दाखविली. या धरणे आंदोलनावेळी कामबंद ठेवण्यात आले होते. निर्णय न झाल्यास २९ डिसेंबर रोजी काळ्याफिती लावून काम करून शासनाचा निषेध करणे, ३१ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारीपासून संपूर्ण राज्यभर नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ