शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यावर भर द्या - केंद्रीय पथक प्रमुख डॉ. ए. जी. अलोने यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:30 IST

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा समितीकडून आढावा

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे (ओएचएफडब्ल्यू) वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने यांनी दिले. कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवक यांचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचविले.जळगाव शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या समवेत शनिवारी दुपारी आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार रक्षा खडसे, केंद्रीय समितीचे सदस्य, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.एस.डी. खारपाडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कोरोना रुग्णालयाचे प्रशासक डॉ.बी.एन.पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप विभागीय अधिकारी दीपमाला चौरे, सीमा आहिरे, रामसिंग सुलाने, अजित थोरबोले, तुकाराम हुलवळे, इंडियन मेडिकल असोशियनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ.दीपक पाटील, सचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ.अजित पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.झोपडपट्टीचा, घरांची गर्दी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत कराजिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत, झोपडपट्टीचा भाग तसेच जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे, जेष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक असल्याचे या वेळी डॉ. अलोने यांनी या वेळी सांगितले. उच्च रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे का तसेच त्यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे, याबाबतही कायम आढावा घेण्यात यावा, याकामी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची नेमणूक करावी, जेणेकरून या कामात गती येईल व स्वयंसेवक त्याच भागातील असल्याने तातडीने उपाययोजना करणे सुलभ होईल असे सांगतानाच पल्स आॅक्सिमीटरचा वापर करण्यात यावा, संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येवून चाचण्यांचे निदान (स्वॅबचे रिपोर्ट) २४ तासात प्राप्त होतील अशा उपाययोजना कराव्यात, कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी, कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांनादेखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.बेड व्यवस्थापन तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन यंत्रणा अत्यंत गतिमान कराजळगाव शहरात कोणत्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध आहेत, याचे डॅशबोर्ड तयार करून ठेवावे, या डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना बेड उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. बेड व्यवस्थापन यंत्रणा तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन यंत्रणा अत्यंत गतिमान करा असे निर्देश डॉ. अलोने यांनी दिले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या, परिसरनिहाय रुग्ण, रुग्णांमध्ये असलेले विविध आजार, रुग्णांचे वर्गीकरण, कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण त्याची कारणे, प्रतिबंधित क्षेत्राचा तपशील, घरोघरी झालेले सर्व्हेक्षण, कोविड सेंटर, शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांची स्थिती आदींचा आढावा यावेळी पथकाने घेतला.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह उपस्थित अधिकाºयांनी जिल्ह्यातील आतापर्यंत तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, प्रतिबंधित क्षेत्र आणि त्यातील उपाययोजना, तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सादर केली.आढावा बैठकीनंतर केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकाºयांसह कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाºयांनी संयुक्तरित्या कोविड रुग्णालयाची तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करून माहिती घेतली. तसेच यंत्रणेला पथकाकडून आवश्यक त्या सूचना व निर्देशही दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव