शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

Emotional Story: कर्जाचा ऐसा आवळला ‘लगाम’, पोटची दोन्ही मुले केली ‘गुलाम’...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 06:13 IST

असहाय बाप, डसला सावकारी साप; ‘चाइल्ड लाइन’कडून सुटका

- कुंदन पाटीललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : उसनवारीने पैसे घेतले आणि फाटक्या मजूर बापाला सावकारी व्याजाने घेरले. व्याजही फुगत गेले आणि उसनवारीची परतफेड करणे अवघड झाले. तिथेच सावकाराला फावले आणि नाईलाजास्तव मजूर बापाने कर्जापोटी दोन्ही चिमुरड्या लेकरांना सावकाराच्या दावणीला बांधले. मातृत्व हरपलेले कोवळे हात मेंढ्या चारत गेले, तेव्हा ‘चाइल्ड लाइन’ चिमुरड्या भावंडांसाठी ‘माय’ बनून धावली आणि दोघांना नवे आयुष्य लाभले. 

मुक्ताईनगरच्या दुर्गम पाड्यातील हा धक्कादायक प्रकार. १० आणि १२ वर्षांची ही भावंडे मजूर बापासोबत वास्तव्यास आहेत. मातृछत्र हरपलेल्या चिमुरड्यांच्या बापाने गाव सोडले. तत्पूर्वी पाड्यावरच्याच  मेंढपाळ सावकाराकडून उसनवारीने पैसे घेतले आणि तो अन्य तालुक्यात मजुरी करू लागला. सावकाराने परतफेडीसाठी जहरी तगादा लावला. सावकाराची नजर दोघा भावंडांवर पडली. त्यांना त्याने सावकारी पाशात अडकवायला सुरुवात केली. बापाशी जुलमी सौदा केला. उसनवारीची रक्कम माफ केली आणि दोन्ही मुलांच्या मोबदल्यात २५ हजार रुपये दिले. दोन्ही मुले वर्षभर सावकाराकडे जंगलात राहून मेंढ्या चारतील, असा सौदा झाला. बापाने सावकाराच्या दावणीला मुले बांधली. 

असा झाला उलगडाnदोन्ही पोरं राबू लागली. निरागस पाय रक्ताळत गेले. मेंढपाळ पाड्यावर आणि दोन्ही चिमुरडे रात्रंदिवस डोंगरावर, असा वेदनादायी प्रवास सुरू झाला. अशातच ग्रा.पं. सदस्य शोएब नूर मोहंमद पटेल यांना दोन्ही मुलांच्या रक्ताळलेल्या तळपायातले दु:ख दिसले. पटेल यांनी ‘चाइल्ड लाइन’ला माहिती दिली. त्यानंतर, हा प्रकार जळगावच्या बालकल्याण समितीला कळविण्यात आला.  

सावकाराने धुडकावले, पथकावर केला हल्ला   ‘चाइल्ड लाइन’चे पथक पोलिसांसोबत पाड्यावर पोहोचले. सावकाराकडे गेले. मात्र, सावकाराने धुडकावून लावले. पोलिसांना तो मुले माझ्याकडे नाहीत, असे सांगू लागला. पथकाच्या अंगावर कुत्रे सोडले. हाणामारीचाही प्रयत्न केला. शेवटी सावकाराने दोन्ही मुलांना या पथकाच्या ताब्यात दिले.  

दोघांना पाठविले बालगृहात : दोघा बालकांना जळगावच्या बालकल्याण समितीसमोर आणण्यात आले. तेव्हा समितीने संगोपनासाठी दोघांना बालगृहात पाठविण्यात आले. या दोघा भावंडांनी आता शकुंतला विद्यालयात प्रवेश घेतला आहे.

‘चाइल्ड लाइन’च्या माध्यमातून बालकल्याण समितीने बालपणातले दु:ख पुसले आहे. दोघेही शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. - डॉ.वनिता सोनगत, महिला व बालविकास अधिकारी.

टॅग्स :Muktainagarमुक्ताईनगर