शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सट्टा, पत्ता, दारु बंदीसाठी महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 18:08 IST

तक्रारी करुनही सट्टा, पत्ता, दारु का बंद होत नाही? असा संतप्त सवाल करत सुटकार, ता.चोपडा येथील शेकडो महिलांनी अडावद पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत ठिय्या मांडला.

ठळक मुद्देसुटकार येथील महिलांचा अडावद पोलीस स्टेशनला ठिय्याअवैध धंदे बंद करण्याचे पोलिसांचे आश्वासन

अडावद, ता.चोपडा, जि.जळगाव : तक्रारी करुनही सट्टा, पत्ता, दारु का बंद होत नाही? असा संतप्त सवाल करत सुटकार, ता.चोपडा येथील शेकडो महिलांनी अडावद पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत ठिय्या मांडला. यावेळी सपोनी योगेश तांदळे यांनी महिलांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. अवैध धंदे त्वरित बंद होतील, असे ठोस आश्वासन मिळाल्याने महिला माघारी परतल्या. आंदोलनामुळे अडावद पोलीस स्टेशन गजबजले होते.येथून जवळच असलेल्या सुटकार येथे सट्टा, पत्ता, दारू सर्रास सुरू असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, कुटुंबे देशोधडीला लागत आहेत. अशा परिस्थितीत अवैध धंदे त्वरित बंद करावेत यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी १० रोजी सकाळी ११ वाजता सुटकार येथील शेकडो महिलांनी मोर्चा काढत अडावद पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. शेकडो महिला, ग्रामस्थ, बालगोपाल आदींनी सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. अवैध धंदे चालतातच कसे? यांच्यावर कोणाचा वरदहस्त? असे सवाल उपस्थित करीत महिलांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला.अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश तांदळे यांनी महिलांशी सविस्तर चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी महिलांनी आपापली गाºहाणी मांडली. अखेर सपोनि योगेश तांदळे यांनी ठोस कारवाई करणार असल्याचे आश्वस्त केल्याने महिलांना ठिय्या आंदोलन मागे घेतले.मुजोर व्यावसायिकांना कुणाचे अभय?सुटकार, वटारसह परिसरात सट्टा, पत्ता, दारू, जुगार यासह वाळूची मोठी तस्करी होत असल्याची नेहमीच ओरड होताना दिसूून येते. मग यांना कारवाईचा धाक का वाटत नाही? परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे शाखा विभाग, महसूल विभाग आदी विभागांकडूनही काही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.यावेळी सुटकारच्या सरपंच मंदाबाई कोळी, पूजा कोळी, रत्नाबाई कोळी, वर्षा कोळी, वैशाली कोळी, कल्पना ठाकरे, संगीता ठाकरे, दीपाली तायडे, मायाबाई कोळी, कोकिळाबाई कोळी, मीराबाई कोळी यासह पोलीस पाटील ज्ञानेश्वर सपकाळे, वासुदेव कोळी, जयराम ठाकरे, मुरलीधर ठाकरे, वासुदेव ठाकरे, दिनकर ठाकरे, साहेबराव ठाकरे, चंद्रकांत सोनवणे, महेंद्र सपकाळे, संदीप सपकाळे, पोउनि यादव भदाणे, पो.ना. कादीर शेख, फारुक तडवी आदींसह महिला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.परिसरात अवैध धंद्यांच्या विरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनाचा कायमचा वचक रहावा यासाठी अवैध धंदेच नाही तर अवैध धंदेवायिकही हद्दपार करणार आहे. त्यासाठी अवैध धंदेचालकांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. लवकर ठोस कारवाई हाती घेण्यात येईल.-योगेश तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, अडावद, ता.चोपडा

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा