शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:06 IST

शेतात सापडला मृतदेह

ठळक मुद्दे शिरसोली येथील रहिवासीआई-वडिल शेतमजूर

जळगाव/ शिरसोली : शिरसोली प्र.बो. येथील शुभम राजू ताडे (वय १७) या शासकीय तांत्रिक विद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थ्याने जळगाव -पाचोरा रोडवरील एका कपाशीच्या शेतात विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गुरूवारी कॉलेजला जातो असे सांगून बाहेर गेलेल्या शुभमने आत्महत्या केल्याची वार्ता सकाळी गावात पोहचताच त्याच्या आई-वडिलांनी शोक व्यक्त केला.शुभम हा जळगाव येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात ११ वीत (एमसीव्हीसी) इलेक्ट्रीक विषयाचे शिक्षण घेत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे विद्यालय आहे. गुरूवारी त्याचा पेपर होता त्यामुळे सकाळी १० वाजता तो घरातून बाहेर पडला.कामाला जातो म्हणून झाले दुर्लक्षरोज सायंकाळपर्यंत शुभम घरी येतो. मात्र तो गुरूवारी परतला नाही. काही वेळेस तो खाजगी कंपनीत कामालाही जातो. त्यामुळे कामावर गेला असेल म्हणून घरच्यांनी दुर्लक्ष केले. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही.पोलीस पाटलाने दिली माहितीसकाळी कुटुंबियांकडून शुभमची शोधाशोध सुरू होती. सकाळी ९ वाजता जळगाव -पाचोरा रोडवरील श्यामा फायर जवळील नारायण भगवान गवळी यांच्या शेतात एका अनोळखी मुलाचा मृतदेह पडला असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबत शिरसोली प्र.बो.चे पोलीस पाटील शरद पाटील यांना ही माहिती कळविली. त्यांनी शेताकडे धाव घेतली असता हा मृतदेह शुभमचा असल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हेकॉ. जितेंद्र राठोड, प्रकाश पवार, श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.आई-वडिल शेतमजूरशुभमचे आई वडिल शेतमजूर आहेत. वडिल राजू भगवान ताडे (बारी), आई व मोठा भाऊ राहूल असे चौघे असतात. राहूल हा देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रीकल डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव