जळगाव : इलेक्ट्रीकलचे काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने श्रीकांत प्रमोद सपके (१९, रा.मारोती पेठ, जुने जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता गांधी मार्केटमध्ये घडली. श्रीकांत याने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. काही दिवसापूर्वीच गांधी मार्केटमधील निशांत इलेक्ट्रीकल या दुकानात कामाला लागला होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता त्याला दुकानातच विजेचा धक्का बसला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानातील सहकाºयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र वैद्यकिय अधिकाºयांनी तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले. रात्री गणेश मंडळात मित्रांसोबत जल्लोषश्रीकांत याने सोमवारी रात्री मित्रांसोबत वीर बाजी प्रभु गणेश मंडळात जल्लोष केला. त्यांच्यासोबत तो नाचलाही. अतिशय गुणी व कष्टाळू अशी त्याची ओळख होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तो दुकानात कामाला लागला होता. कुटुंबाला थोडा हातभार लागायला सुरुवात झाली आणि अशी दुर्देवी घटना घडली. श्रीकांत याचा भाऊ लोकेश हा अकरावीला शिक्षण घेत असून आई निकिता गृहीणी आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 21:48 IST
इलेक्ट्रीकलचे काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने श्रीकांत प्रमोद सपके (१९, रा.मारोती पेठ, जुने जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता गांधी मार्केटमध्ये घडली. श्रीकांत याने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. काही दिवसापूर्वीच गांधी मार्केटमधील निशांत इलेक्ट्रीकल या दुकानात कामाला लागला होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता त्याला दुकानातच विजेचा धक्का बसला.
जळगावात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्देगांधी मार्केटमधील घटना नुकतान लागला होता कामाला