शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

निवडणुकीचे गणित युती-आघाडीच्या निर्णयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:21 IST

हालचाली : कॉँग्रेस-राष्ट्रवादी समोर संघटनेचा अभाव ; भाजपामध्ये भाऊगर्दी

अजय पाटीलजळगाव: तीन महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. जळगाव शहरात सध्या भाजपाचे आमदार असले तरी गेल्यावेळेस भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते. दरम्यान, जळगावची जागा ही शिवसेनेची असल्याने शिवसेनेकडून या जागेवर हक्क सांगितला जात आहे. तर विद्यमान आमदार भाजपाचा असल्याने भाजपा देखील ही जागा सोडण्याचा तयारीत दिसून येत नाही.हीच स्थिती कॉँग्रेस व राष्ट्रवादी ची देखील पहायला मिळत असून, युती-आघाडीच्या निर्णयावर जळगाव शहर विधानसभेचे गणित ठरणार आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना, कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आपआपल्या युती-आघाडी तोडत एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते. दरम्यान, एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा हे चारही प्रमुख पक्ष युती-आघाडी करूनच निवडणूक लढले. त्यामुळे विधानसभेत देखील युती-आघाडी कायम राहिल्यास जळगाव शहर विधानसभेची जागा युतीकडून भाजपाच्या वाट्याला जाते की शिवसेनेला मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुरेश जैन यांचा भाजपाचे उमेदवार सुरेश भोळे यांनी ४२ हजार ३१४ मतांनी पराभव केला होता.गेल्या पाच वर्षात भाजपाने शहरात संघटना मोठ्या प्रमाणात वाढवली असून, २०१८ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत देखील पहिल्यांदाच मोठे यश मिळवत ५७ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला केवळ १५ जागा जिंकता आल्या होत्या. जळगाव शहरात शिवसेना व भाजपाकडून दावा केला जात असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. दरम्यान, ही जागा शिवसेनेला गेल्यास माजी मंत्री सुरेशदादा जैन हेच शिवसेनेचे उमेदवार राहणार आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसला जळगाव शहरात अद्याप संघटन जमविता आले नसून, त्यांच्यासमोर शिवसेना-भाजपाचे मोठे आव्हान आहे. मनपा निवडणुकीत या दोन्हीही पक्षांना खाते देखील उघडता आले नव्हते.पक्षनिहाय इच्छुक उमेदवारभाजपविद्यमान आमदार सुरेश भोळे हे यंदाही भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, ललित कोल्हे, सुनील खडके हे देखील इच्छुक आहेत. तसेच ऐनवेळी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा पक्षश्रेष्ठींकडून विचार होवू शकतो.शिवसेनामाजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित आहे. मात्र, त्यांनी नकार दिल्यास शिवसेनेकडून माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे किंवा सुनील महाजन, यांना संधी मिळू शकते.राष्ट्रवादी व कॉँग्रेसराष्ट्रवादीकडून विलास भाऊलाल पाटील तर कॉँग्रेसकडून डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. एमआयएम कडून रियान जहागीरदार इच्छूक आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव