शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

एकनाथ खडसे लोकसभेच्या मैदानात..! सून रक्षा खडसेंच्या विरुद्ध लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 18:56 IST

रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय.

प्रशांत भदाणे 

जळगाव:- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी स्वतः जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे ते त्यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसेंच्या विरोधात निवडणूक लढतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे; आणि ती म्हणजे आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक... या निवडणुकीसाठी महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. जागांचं वाटप, त्याचबरोबर उमेदवार कोण असेल, तो कोणत्या मतदारसंघातून लढेल यावर खल सुरू झाला आहे.

या साऱ्या भाऊगर्दीत मागे राहतील ते एकनाथ खडसे कसले... खडसेंनी आपण जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार असल्याचं अगदी ठासून सांगितलं. या मतदारसंघात सध्या त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरतील का? अशी चर्चा रंगली आहे. 

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रावेर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मिळावी, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. ही जागा जर आम्हाला मिळाली तर उमेदवारीसाठी माझ्या नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती मी पक्षाकडे केली आहे आणि पक्षाने पण मला केली आहे. मी निवडणूक लढायला उत्सुक आहे, असं खडसे या विषयासंदर्भात म्हणाले आहेत.  दरम्यान, रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय. मोदींचा प्रभाव पाहता त्या हॅट्रिक करायच्या मूडमध्ये आहेत. खडसेंनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतर त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, रावेर लोकसभेचे मी दोन टर्म झाले प्रतिनिधित्व करत आहे. पक्षाने मला पुन्हा संधी दिली तर मी पुन्हा याठिकाणी लढायला तयार आहे. शेवटी पक्ष याबाबत निर्णय घेईल, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

येत्या निवडणुकीत रक्षा खडसेंचा पत्ता कापला जाईल, त्यांच्या ऐवजी गिरीश महाजन उमेदवार असतील, असंही बोललं जातंय. त्यावरही रक्षा खडसेंनी म्हणणं मांडलं. गिरीश महाजन हे आमचे नेते आहेत. त्यांचे नाव जर रावेर लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून पुढे येत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करू... त्यांना निवडून आणू... असं रक्षा खडसे म्हणाल्या.

दरम्यान, एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंनी आपापली भूमिका तर जाहीर करून टाकली आहे. पण दोघांना त्यांचे पक्ष उमेदवारी देतील का? दिली तर सासरा आणि सुनेत कोण बाजी मारेल? हे पाहणं महत्वाचं असेल.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगावRaverरावेरlok sabhaलोकसभा