शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

मुक्ताईनगर येथे ट्रॅक्टर ट्रॉली उलटून आठ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 16:51 IST

श्री विसर्जन आटोपल्यानंतर महाविद्यालयातील घटना

ठळक मुद्देनीरज अवतारे, लोकेश महाजन व स्वप्नील नारखेडे या तिघा विद्यार्थ्यांना जबर मार लागल्याने त्यांना जळगावी हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती समजताच खासदार रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेतली. गंभीर जखमींना तातडीने जळगाव रवाना केले.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील जी.जी.खडसे महाविद्यालयातील पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करून परतलेले ट्रॅक्टर महाविद्यालयाच्या आवारात उलटून त्यात आठ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी दोनला घडली. यातील तिघा जखमींना जळगावला हलविण्यात आले आहे.जखमींमध्ये लोकेश पुंजाजी महाजन, आदेश ओमप्रकाश नेमाडे, नीरज अवतारे, आदर्श बिराडे, चेतन युवराज चिमकर, निकेश सुनील कोथळकर, हर्ष कोळी, स्वप्नील नारखेडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी नीरज अवतारे, लोकेश महाजन व स्वप्नील नारखेडे यांना जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.खडसे महाविद्यालयात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही विद्यार्थ्यांनी श्रींची स्थापना केली होती. पाच दिवसांचा गणपती येथे साजरा होतो. परंपरेप्रमाणे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक महाविद्यालयात उत्साहात पार पडली. मिरवणुकीनंतर ट्रॅक्टरद्वारे पूर्णा नदी खामखेडा पुलावर श्रींचे विसर्जन आटोपून परतणारे विद्यार्थी महाविद्यालयाच्या पटांगणात परतले. येथे भरधाव ट्रॅक्टर वळवताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने डॉ.एन.जी.मराठे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातMuktainagarमुक्ताईनगर