शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

ना दिखावा, ना बडेजाव; आठ जोडपी अवघ्या एक रुपयात अडकली विवाह बंधनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:19 IST

मराठा उद्योजक संस्थेचा उपक्रम

जळगाव: लग्न पहावे करुन असे म्हणतात. अलीकडे तर विवाह सोहळ्यांना इव्हेन्टचा लूकही दिला जातो. प्रतिष्ठेचा बडेजाव करताना लाखो रुपये खर्च केले जातात. या सर्व बडेजावाला फाटा देत अवघ्या एक रूपयात आठ जोडप्यांचे शुभमंगल करण्याची किमया मराठा उद्योजक विकास मंडळ व अ.भा. क्षत्रिय मराठा महामंडळाने केली आहे. या सोहळ्याने अक्षतांना जणू सामाजिक बांधिलकीचे कोंदण लाभले होते. आदर्शाचे सनईस्वर आळवत हा सामूहिक विवाह सोहळा शनिवारी दुपारी सागर पार्क मैदानावर हर्षोल्हासात पार पडला. यावेळी नवदाम्पत्यांना समाज बांधवांकडून संसारोपयोगी भेट वस्तू देण्यात आल्या. या सोहळ्यात माधुरी कदम-सागर शेलार, पूनम वायकर-वसंत आभाळे, मानसी माळतकर-राहुल इंगळे, आरती लंके-नीलेश गुंजाळ, निकिता शेट्ये-भागवत गायकवाड, योगिता शिंदे-राजेंद्र साळुंके, उज्ज्वला आवटे-अनिल शेळके, दीपाली सुर्यवंशी-मनोहर जाधव या आठ जोडप्यांचा विवाह झाला. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न