शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

काउंटरवर चॉपर ठेऊन गल्ल्यातून जबरीने काढले साडेआठ हजार रूपये

By सागर दुबे | Updated: September 2, 2022 19:54 IST

पैसे जर दिले नाही तर मी तुला व्यवसाय करू देणार नाही...

जळगाव : पैसे जर दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत एकाने चॉपरचा धाक दाखवून मेडिकल चालकाच्या दुकानाच्या गल्ल्यातून साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतल्याचा प्रकार बुधवारी रात्री ८.३० वाजता गेंदालाल मिल भागात घडला. याप्रकरणी मेडिकल चालकाने शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

दादावाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांचे गेंदालाल मिल येथे रामकृष्ण मेडिकल नावाचे औषधींचे दुकान आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मेडिकलवर अजीज खान बाबुखान पठाण (रा. गेंदालाल मिल) हा आला आणि तुला तुझे दुकान चालवायचे असेल तर मला पाच हजार रूपये महिना द्यावा लागेल, असे पाटील यांना म्हणला. मात्र, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर अजीज खान याने कमरेला लावलेला चॉपर काउंटरवर ठेवून पैसे जर मला दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देऊन त्याने पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर दुकानाच्या गल्ल्यातून अजीज खान याने साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतली. मारहाण झाल्यामुळे पाटील हे जखमी झाले होते. उपचारानंतर त्यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार अजीज खान याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताला अटकदरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील एपीआय संदीप परदेशी, ओमप्रकाश सोनी, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गिते, विजय निकुंभ आदींनी गेंदालाल मिल गाठून संशयित अजीज खान याला अटक केली आहे.

यापूर्वीही दुकानाची केली तोडफोडअजीज खान याने यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी बाळासाहेब पाटील यांच्या दुकानात येऊन तोडफोड केली होती. नंतर त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी हिसकावून पोबारा केला होता.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी