शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून मिळतेय शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:30 IST

नशिराबाद उर्दू जि़ प़ शाळा: विद्यार्थी घेत आहेत डिजीटल शिक्षण, दर्जेदार प्रयोगशाळेमुळे रूजतेय संशोधनाची आवड

सागर दुबेजळगाव : केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, दफ्तराचे ओझे न बाळगता डिजिटलाइज शिक्षण मुलांना दिले जात आहे ते जळगाव नशिराबाद येथील नशिराबाद जिल्हा परिषद उर्दू केंद्र मुलांची शाळेत़ मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपक्रम राबविणारी ही शाळा प्रयोगशील शाळा ठरत आहे.दरम्यान, विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत गावाचे नाव जिल्हाभरात उज्ज्वल करीत आहेत़ बोलक्या भिंती, विज्ञान प्रयोगशाळा लक्ष वेधून घेतात़ लोकसहभागातून शाळेचा कायापालट झाला आहे़१ सप्टेंबर १८८१मध्ये शाळेची स्थापना झाली. सध्या पहिली ते ७ वी ३४८ विद्यार्थी आहेत. शाळेत ४ एलईडी स्क्रीन, तीन टॅब, स्मार्ट बोर्ड, २ संगणक आहेत. २०१६मध्ये उपक्रमशील शाळा म्हणून गौरव झाला आहे़त्याचबरोबर २०१८मध्ये प्रयोगशाळा कार्यान्वित होऊन त्यात ५२० प्रयोग आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली आहे़विशेष म्हणजे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानातील उत्कृष्ट कार्याबाबत नशिराबाद उर्दू शाळेचा गौरव झाला आहे़ त्यामुळे वेगळा ठसा या शाळेने उमटविला आहे़तसेच आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद उर्दू केंद्र्र मुलांची शाळा जळगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आली आहे. तसेच शाळा-सिध्दी मूल्यांकनात शाळेने अ दर्जा प्राप्त केला असून जिल्ह्यात नशिराबाद उर्दू शाळा ही आदर्श ठरत आहे़२२ शाळांनी दिल्या भेटीशाळेने आयएसओ मानांकनासह शाळा-सिध्दी मूल्यांकनात सुध्दा अ दर्जा प्राप्त केला आहे़ शाळेच्या कार्याचा लेखाजोखा पाहण्यासाठी तब्बल २२ शाळांनी ऊर्दू शाळेला भेटी दिल्या आहेत़ क्रीडा चषक स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकाविले आहे़ उत्कृष्ट प्रयोग शाळा तयार केली़ आहे़ त्याठिकाणी विविध प्रयोग विद्यार्थी करतात़ दर शनिवारी दफ्तरमुक्त उपक्रम राबवून दफ्तराचे ओझे कमी केले जाते़शाळेला यांचे मिळतेय मार्गदर्शनशाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील, उपशिक्षणाधिकारी डी़ एम़ देवांग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख शरीफ शेख हनीफ, गटशिक्षणाधिकारी एस़ एस़ चौधरी, विस्तार अधिकारी खलील शेख, केंद्रप्रमुख मसूद शेख, जि़ल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती यमुना रोटे, विकास पाटील, जयश्री पाटील आदी़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव