शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 15:00 IST

निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगिनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनाचे मनोभावे दान वट वृक्षाकडे मागितले.

चाळीसगाव, जि.जळगाव : निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगिनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनाचे मनोभावे दान वटवृक्षाकडे मागितले.दरवर्षी मान्सूनपूर्व सरींनी वटपूजेचा सण आनंदात होत असतो. पूर्वीच्या काळी मातीचा ओला गंध, अंकुरलेले कोवळे तृणांकुर, पसरलेली हिरवाई आणि थंड हवेच्या झोक्यात वटपूजा साजरी व्हायची. पण गेली अनेक वर्षे वटपूजा कडक उन्हात साजरी होत आहे. प्रकृतीच्या सृजनशीलतेचा व नवनिर्मितीच्या प्रारंभी येणाºया वटवृक्ष पूजेतून सन्मानित व्हावे आणि निसर्ग सर्वार्थाने बहरावा आणि धरती सृजनशील व्हावी म्हणून आज महिलांच्या वतीने दान मागितले गेले.निसर्ग प्रफुल्लीत राहिला तर मानवी जीवन समाधानी राहिल म्हणून आज गृहिणीनी नवनिर्मितीचा प्रणेता असलेल्या सजीव वरुणदेवाची व वर्षाॠतुची वटपूजा बांधून मनोभावे प्रार्थना केली. सर्व चराचर सृष्टीची भरभराट होवो, पाऊस चांगला पडो, शिवारात धनधान्य उपजो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. यावेळी शोभा कोतकर, सुनंदा ब्राह्मणकर, अलका शाह, कविता साळुंखे, जयश्री भोकरे, योगिनी ब्राह्मणकर, निर्मला महाजन, छाया महाजन आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

टॅग्स :environmentवातावरणChalisgaonचाळीसगाव