शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल, खरेदीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:39 IST

चीनच्या फटाक्यांना यंदाही ‘ना’

जळगाव : दिवाळी सणाला फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषण न होण्याच्या सक्तीनंतर व तसे प्रमाणपत्र घेणे सक्तीचे केल्याने त्याची बहुतांश कंपन्यांनी अंमलबजावणी केल्यानंतर बाजारात पर्यावरणपूरक फटाके (ग्रीन फायरवर्क) दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील चीनचे फटाके विक्री न करण्याचा निर्धार विक्रेत्यांनी केला आहे.दिवाळी म्हटले म्हणजे फटाक्यांची जोरदार आतीशबाजी हे शेकडो वर्षांचे गणित आहे. पर्यावरणाच्या मुद्यावरून यंदा नागपूर येथील संस्थेला पर्यावरणपूरक फटाक्यांचे नमुने तयार करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार संस्थेकडून प्रमाणपत्रही सक्तीचे करण्यात आले. यात जळगावात देशातील विविध भागातून फटाके दाखल झाले असून त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.बाजारपेठेत साधारण १२० रुपयांपासून ते तीन हजार रुपये किंमतीचे फटाक्यांचे खोके (बॉक्स) बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहेत. लहान फटाके, रंगबेरंगी फटाके तसेच मोठे बॉम्ब असे विविध प्रकारचे फटाके असलेले हे बॉक्स सध्या आकर्षण ठरत असून त्या सोबतच सुट्या फटाक्यांनाही मागणी असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ९ वस्तूंचा गिफ्ट बॉक्स १२० रुपये, १८ वस्तूंचा बॉक्स २१० रुपये, २६ वस्तूंचा बॉक्स ४०० रुपये, ३८ वस्तूंचा बॉक्स ६३० रुपये व त्यापेक्षाही मोठे बॉक्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत.विविध प्रकारचे फटाके वेधताहेत लक्षबाजारपेठेत दाखल झालेल्या फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके, विविध प्रकारचे रॉकेट तसेच फ्लॉवर पॉटमध्ये रंगीला, बो-बो, क्रॉकलिंग, मल्टी कलर पॉट तर चक्करमध्ये २५ शॉटस्, ५० शॉटस्, १०० शॉटस्, २०० शॉटस्, ५०० शॉटस् हे फटाके आकर्षण ठरत असून त्यांना जास्त मागणी असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीच्या १० दिवस अगोदर फटाके खरेदीसाठी दरवर्षी गर्दी होत असते, मात्र यंदा त्यापूर्वीच होलसेल विक्रीसह किरकोळ विक्रीस सुरुवात झाली आहे. यंदा पाऊसही चांगला झाला असल्याने फटाक्यांची खरेदी वाढली असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.बाजारपेठेत फटाक्यांना चांगली मागणी असून खरेदीला वेग आला आहे. - चंद्रकांत शिरोडे, अध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशन.बाजारपेठेत विविध प्रकारचे फटाके दाखल झाले असून यंदा अनेक कंपन्यांनी पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती केली आहे.- युसुफ मकरा, कार्याध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशन.बाजारपेठेत विविध प्रकारचे व वेगवेगळ््या आकारातील फटाक्यांचे बॉक्स उपलब्ध आहेत. त्यांना पसंती दिली जात आहे.-शब्बीर मकरा, फटाकेविक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव