शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

झोपडपट्टीतील मुलांच्या कलाकृतीने शहरवासीय थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:53 IST

चित्र व विविध वस्तूंचे प्रदर्शन

ठळक मुद्दे‘आनंदघरा’तील कलाकुसरांनी अनोखा आनंदखेळात रमले चिमुकले

जळगाव : हसत खेळत गिरविले जाणारे अंक-अक्षरे, भाषीक खेळातून लागणारी वाचनाची गोडी अशा शैक्षणिक साहित्यासह टाकावू वस्तूंपासून तयार केलेल्या फुलदानी, मनमोहक खेळणे अशा एकाहून एक सरस वस्तू आणि आपल्या बाल विश्वातील कल्पना कुंचल्यातून मांडून साकारलेले चित्र प्रदर्शन ‘आनंदघरा’तील मुलांना अनोखा आनंद तर देऊनच गेले सोबतच या प्रदर्शनाने शहरवासीयांची रविवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली.निमित्त होते वर्धिष्णू सोशल रिसर्च डेव्हलपमेंट सोसायटीमार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘आनंदघरा’तील मुलांनी साकारलेल्या चित्र व विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे.शहरातील झोपडपट्टी भागातील अनेक कुटुंबातील मुलांनी आर्थिक परिस्थिती व कुटुंबात शिक्षणाचा अभाव असल्याने शाळेकडे पाठ फिरवली आहे. कचरा वेचणे तसेच बाल मजुरी करणा-या या मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी अद्वैत दंडवते यांच्या पुढाकाराने वर्धिष्णू सोशल रिसर्च डेव्हलपमेंट सोसायटीमार्फत काम केले जात आहे. यासाठी सोसायटीच्यावतीने ‘आनंदघर’ उपक्रम राबविला जाऊन येथे शिक्षणासह त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जाते.याच ‘आनंदघरा’ला पाच वर्षे होत असल्याने त्यानिमित्त आनंदघरातील मुलांनीच तयार केलेल्या विविध वस्तू व चित्रांचे प्रदर्शन व स्नेह मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळाला.खेळात रमले चिमुकलेसकाळी झालेल्या स्नेहमेळाव्यात मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. तसेच गाणी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मुले भारावून गेले. सोबतच विविध उपक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.टाकावूपासून शोभिवंत वस्तूसंध्याकाळी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित प्रदर्शनात ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात टाकावू वस्तूंपासून तयार केलेल्या शोभिवंत वस्तू मांडण्यात आल्या होत्या. आईस्क्रीम असो की कुल्फी ते खाल्यानंतर आपण त्याच्या काड्या फेकून देतो. मात्र त्याच काड्यांपासून या मुलांनी तयार केलेले मंदिर, बाहुल्या आकर्षण ठरल्या. त्यासाठी लग्न पत्रिकांचाही खुबीने वापर करीत घरात शोकेसमध्ये ठेवण्यासाठी उपयोग होण्याबाबत कौतूक करण्यात आले.या सोबतच रंगबिरंगी कागदांपासून तयार विविध आकारातील फुलदाणी, भेट कार्ड (ग्रिटींग), पक्षी, छोट्या-छोट्या गाड्या लक्ष वेधून घेत होत्या.खेळातून करा गणिते‘खेळातून शिक्षण’ या अनोख्या साहित्यातून मुलांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. या सोबतच नावावरुन प्राणी ओळखणे व त्यातून अक्षर ओळख, शब्द वाचन करणे कसे शक्य आहे, हे प्रदर्शनाने दाखवून दिले.आरोग्यविषयक व स्वच्छतेचाही संदेशमासिक पाळीसंदर्भात सहजासहजी कोणी बोलत नाही व मुलींनाही मार्गदर्शन होत नाही. मात्र त्याबाबत योग्य माहिती मिळावी म्हणून ‘संवाद मासिक पाळीशी’ असा आरोग्यविषयक संदेश देणारी माहितीही येथे उपलब्ध करून देण्यात आली होती. या ठिकाणी पाळी दरम्यान कशी काळजी घ्यावी याचे पत्रक ठेवण्यात येऊन काळजी न घेतल्यास काय परिणाम होतो हे सापशिडीच्या माध्यामातून दाखविण्यात आले. सोबतच ‘निर्मल’ या उपक्रमाद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्या विषयी असलेल्या गाण्यांच्या ओळी भेट देणा-यांनी आवर्जून वाचल्या.संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शनास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने भेट देऊन चिमुकल्यांचे तोंडभरुन कौतूक केले. सोबतच संस्थेच्या उपक्रमास दाद दिली. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत शहरवासीयांची रिघ कायम होती.

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव