शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा दिला नाही म्हणून जळगावात नवरदेवाने लग्न मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:42 IST

वसंतवाडीच्या वधूने केली पोलिसात फसवणुकीची तक्रार

ठळक मुद्देनवरदेवाने ५० हजार रुपये रोख व १० ग्रॅमची सोन्याच्या अंगठीची केली मागणीलग्न मोडल्याने वधू पक्षावर ओढवले मोठ संकटवधूच्या वडीलांनी दिली एमआयडीसी पोलिसांत तक्रार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २८ : साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख निश्चित होऊन त्यासाठी मंडप, वाजंत्री, घोडा, लग्नपत्रिका आदी तयारी झालेली असतानाच ऐनवेळी नवरदेवाकडून ५० हजार रुपये हुंडा व १० ग्रॅम सोन्याच्या साखळीची मागणी करण्यात आली. ती पूर्तता करण्यास वधू पक्षाने नकार देताच नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसंतवाडी, ता.जळगाव येथील वधूच्या वडीलांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसंतवाडी येथील मुलीचा विवाह पळासखेडा (मोगलाई) ता. सोयगाव येथील तरुणासोबत निश्चित झाला. १५ फेब्रुवारी रोजी वसंतवाडी येथे दोघांचा साखरपुडा झाला. त्यादिवशी २३ एप्रिल २०१८ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार मंडप, घोडा, वाजंत्री बुक करुन लग्नपत्रिका छापल्या. गावोगावी पत्रिका वाटपाचे काम सुरु असतानाच नवरदेवाच्या वडीलांनी नवरीकडील मंडळीला २६ फेब्रुवारी रोजी पळासखेडा येथे बोलावून घेतले. त्यानुसार नवरीचे आई, वडील व मेहुणे तेथे गेले होते.नवरदेवाच्या घरी बैठक बसल्यानंतर नवरदेवाने ५० हजार रुपये रोख व १० ग्रॅमची सोन्याची अंगठी आदीची मागणी केली. आपल्या समाजात हुंड्याची पध्दत नाही असे माहिती असतानाही त्यांनी तुम्ही जर पुर्तता करु शकत नसाल तर आम्ही आताच लग्न मोडत असल्याचे जाहिर करुन शिवीगाळ करीत घरातून हाकलून लावले. लग्न मोडल्याने वधू पक्षावर मोठ संकट कोसळले.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस