भुसावळ, जि.जळगाव : भरधाव वेगात येणाऱ्या डम्परने दुचाकीला धडक दिल्याने त्यात दुचाकीवरील कमल प्रभाकर बोंडे (वय ७२) ह्या जागीच ठार झाल्या, तर त्यांचा मुलगा सतीश बोंडे गंभीर जखमी झाला. येथील शिवपूर-कन्हाळे रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्गाजवळील वर्ल्ड स्कूलसमोर बुधवारी सकाळी साडेआठला हा अपघात झाला.किन्ही येथील मूळ रहिवासी व सध्या भुसावळ येथील तुकाराम नगरातील श्रीराम हाऊसिंग सोसायटीत वास्तव्यास असलेल्या कमल प्रभाकर बोंडे ह्या त्यांचा मुलगा सतीश प्रभाकर बोंडे याच्यासह १२ रोजी सकाळी त्यांच्या किन्ही शिवारातील त्यांच्या शेताकडे जात होत्या. तेव्हा समोरुन भरधाव वेगात येणाºया पांढºया रंगाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात कमल बोंडे ह्या जागीच ठार झाल्या, तर त्यांचा मुलगा सतीश हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर डंपरचालक वाहनासह पसार झाला. घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.रामकृष्ण कुंभार, पोउपनि करेवार यांच्यासह कर्मचारी, वर्ल्ड स्कूलचे कर्मचारी व नागरिक तत्काळ दाखल झाले. सर्वांनी मदत केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी, तर जखमीस उपचारार्थ जळगाव येथे हलविले.जखमी सतीश हा बस डेपोत, तर लहान मुलगा विकास हा पुणे येथे कंपनीत कार्यरत आहे. मयताच्या पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे
डंपरची दुचाकीला धडक; आई ठार मुलगा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:16 IST
शिवपूर-कन्हाळे रस्त्यावरील घटना
डंपरची दुचाकीला धडक; आई ठार मुलगा गंभीर
ठळक मुद्देभुसावळ तालुक्यातील घटनाडम्परचालक वाहनासह फरारजखमीस जळगावी हलविले