शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

डमी ग्राहक पाठवून दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:32 IST

चोरलेल्या दुचाकीचे काढून दिले पार्ट-पार्ट

जळगाव : स्पोर्टस् व महागड्या दुचाकी हौशेखातर चोरणाऱ्या तरूणांच्या टोळीचा गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून पर्दाफाश केला़ या टोळीतील किसन यादव व शुभम यादव (रा़ रामेश्वर कॉलनी) या दोन्ही भावांसह एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या तिघांनी दोन महिन्यांपूर्वी चोरलेल्या दुचाकीचे पार्ट-पार्ट पोलिसांना काढून दिले आहेत.सराफ बाजार परिसरातील रहिवासी विशाल अशोक जगदाळे हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत़ ९ फेब्रुवारीला घराजवळ बोहरा गल्लीत त्यांनी त्यांची महागडी दुचाकी उभी केली होती़ मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन तरूणांनी ही दुचाकी चोरून नेली होती़ याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़तसेच टोळीतील चौथ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत़ दरम्यान, दोन दुचाकींची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचे समजते़ या दोघांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ सरकारतर्फे अ‍ॅड़ सुप्रिया क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले़भीतीपोटी दुचाकीचे पार्ट-पार्ट काढलेचौकशीअंती या तरूणांनी सराफ बाजार परिसरातून महागडी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली़ ही दुचाकी काढून सुध्दा दिली मात्र, त्याचे पार्ट-पार्ट या तरूणांनी केले होते़ काही दिवस शुभम व किसन याने ही दुचाकी शहरात फिरविली, दुचाकी फिरविल्यास आपण पकडले जाऊ ही भीती होती़ त्यामुळे त्यांनी अक्षरश: दुचाकीचे पार्ट-पार्ट काढून ते विक्रीला काढले होते, असे त्यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले़ दरम्यान, यांच्याती चौथा संशयित हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत़चोरट्यांची मिळाली माहिती़़़एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुध्दा काही दिवसांपूर्वी काही दुचाकी चोरीला गेल्या होत्या़ त्यामुळे एमआयडीसी पोलीस देखील चोरट्यांच्या शोधात होते़ अखेर या पोलीस ठाण्यातील डी़बी़ कर्मचारी विजय पाटील, मनोज सुरवाडे यांना गुरूवारी रात्री काही तरूण दुचाकीचे पार्ट विक्री करीत असल्याची माहिती मिळाली़ त्यांनी लागलीच एक डमी ग्राहक तयार करून त्या तरूणांकडे पार्टस् खरेदी करण्यासाठी पाठविला़ त्यावेळी ते तरूण दुचाकी चोरच असल्याचे समोर आल्यानंतर पाटील व सुरवाडे यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील यांनी रात्रीच एमआयडीसी हद्दीतून त्या तरूणांना सापळा रचून अटक केली़ कसून चौकशी केल्यानंतर किसन यादव व शुभम यादव असे नाव सांगितले तर त्यांचा साथीदार अल्पवयीन युवकासही ताब्यात घेतले़

टॅग्स :Jalgaonजळगाव