शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जातप्रमाणपत्र न दिल्याने दोन जि.प. सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:20 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका: राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव : जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने रावेर तालुक्यातील वाघोदा-विवरा जि.प. गटातील राष्टÑवादी काँगे्रेसचे सदस्य आत्माराम सुपडू कोळी (रा.विवर)े व हतनूर-तळवेल (ता. भुसावळ)गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला सुनिल कोळी यांना सदस्य पदावरून अपात्र करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.पाल ता. रावेर येथील गोमती सिताराम बारेला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत वाघोदा-विवरे जि.प. गटातील सदस्य आत्माराम सुपडू कोळी यांनी निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या सुनावणीत कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र हे जात वैधता समितीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे दाखल करता आलेले नसल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाºयांनी कोळी यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविले.प्रकाश रामचंद्र मोरे रा.सुसरी ता.भुसावळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हतनूर-तळवेल गटातील अनुसुचित जमाती स्त्री राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरला कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याची तक्रार केली होती. त्यावर सरला कोळी यांनी बाजू मांडताना जात वैधता समितीने जात प्रमाणपत्र १५ नोव्हेंबर २०१८ रोजी एकतर्फी निकाल देऊन अवैध ठरविले. त्याविरूद्ध उच्च न्यायालयात अपिल केले असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्याचा निकाल लागेपर्यंत जिल्हाधिकाºयांकडील सुनावणी तहकूब करावी, अशी मागणी केली. मात्र ती मागणी फेटाळत कोळी यांनाही अपात्र ठरविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अ‍ॅड.हरूल देवरे यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव