जळगाव : अरुंद रस्त्यामुळे आव्हाणे येथून जळगावला जाणारी बस रस्त्याच्याकडेला खड्ड्यात उतरली. मात्र झाडामुळे व चालकाच्या सर्तकतेमपळे ती कोसळली नाही. यामध्ये विद्यार्थ्यांसह प्रवासी बालंबाल बचावले. कागदी मंजूर झालेला रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. अरुंद रस्त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होते.े लहान मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधीनीं याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अरुंद रस्त्यामुळे बस खड्ड्यात, जळगाव-आव्हाणे रस्त्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 13:13 IST