आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२१- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेख मोहसीन शेख मेहमुद (वय-२१, रा़ गेंदालाल मिल) या तरूणास बेदम मारहाण झाल्याची घटना झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तरूणाच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़६ मे रोजी रात्री साडे नऊ वाजता गेंदालालमिल परिसरात काही जणांचे भांडण सुरू होते़ त्यात वडीलांना धक्काबुक्की होत असल्याचे दिसताच शेख मोहसीन याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यास शंकर, गफ्फार, शकुर अकिल, निजाम, मदिना, हुसना (पूर्ण नाव माहित नाही) यांनी काहीही कारण नसताना मारहाण केली़ मारहाणीत शेख मोहसीन हा गंभीर जखमी झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी मोहसीन याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जळगावात किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 15:53 IST
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेख मोहसीन शेख मेहमुद (वय-२१, रा़ गेंदालाल मिल) या तरूणास बेदम मारहाण झाल्याची घटना झाली.
जळगावात किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण
ठळक मुद्देशहर पोलिसात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखलवडिलांना धक्काबुक्की होत असल्याने सोडविले भांडणमारहाणीत शेख मोहसीन गंभीर जखमी