शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

डॉक्टर नसल्यामुळे महिलेची रुग्णालयाच्या आवारात व्हॅनमध्येच प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 17:28 IST

मेहुणबारे येथील प्रकार : अन्य महिलेची नातेवाईकांनी केली प्रस्तुती, कारभाराबाबत संताप

मेहुणबारे ता चाळीसगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. आधिकारीच नसल्याने महेुणबारे येथील महिलेला परत पाठविल्याने तिची या रुग्णालयाच्या आवारातच व्हॅनमध्ये प्रस्तुती झाली. तर धामणगाव येथील महिलेचीही डॉक्टरअभावी नातेवाईक महिलांनी स्वत: रुग्णालयात प्रस्तुती करुन घेतली. याबाबत संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.याबाबत वृत्त असे की, मेहुणबारे येथील जुन्या गावातील तरन्नूृम असलम शहा (वय२३) या महिलेला पहाटे पाच वाजता पोटात दुखायला लागले. कुटुंबातील सदस्यांनी या महीलेला गावातील ग्रामीण रुग्णालयात आणले असता रुग्णालयात उपस्थित पारिचारीकाने त्यांना चाळीसगाव येथे रुग्णालयात घेवून जाण्याचे सांगितले.नातेवाईकांनी हात जोडून विनंती केली की आम्हाला येथे दाखल करुन घ्या मात्र चक्क नकार देत रेफर करण्याचा कागद त्यांच्या हातात दिला. मात्र या महीलेची प्रस्तुती व्हॅनमध्येच रुग्णालयाच्या आवारातच झाली. त्यानंतर महीलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.याचबरोबर धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील गंगाबाई अनिल भिल्ल (२५) या महीलेला रविवारी रात्री दोन वाजता ग्रामीण रुग्णालयात प्रस्तुती करीता दाखल करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता प्रसुती कळा येवु लागल्या मात्र डॉक्टर नसल्याने नातेवाईक घाबरून गेले. तसेच तेथे असलेल्या पारीचारीका जागेवर नसल्याने त्यांनी स्वत: च प्रस्तुती करुन घेतली. बाळाची नाळ तोडण्यासाठी मात्र पारीचारीका आली. या दरम्यान प्रस्तुती होत असताना जर काही जिवाला धोका झाला असता तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रतिक्रिया......मी या प्रकरणाची माहिती घेऊन तातडीने आर.एम.ओ.याना तातडीने पाठवतो. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-डॉ.नागोरावजी चव्हाण , सिव्हिल सर्जन जळगाव.