शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लागवडीचा खर्च निघत नसल्याने भाजी उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:05 IST

तालुक्यातील काही भागात भाजीपाला व कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊनदेखील लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकर्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात विकावा लागत आहे.

जामनेर, जि.जळगाव : यंदा तालुक्यातील काही भागात भाजीपाला व कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊनदेखील लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकर्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात विकावा लागत आहे. लागवडीसाठी झालेला खर्चसुध्दा निघत नसल्याचे शेतकरी सांगतात.वाघूर धरणातील बॅकवॉटरचा फायदा घेत केकतनिंभोरा, चिंचखेडे, हिवरखेडे बुद्रूक, पळासखेडे बुद्रूक व नेरी परिसरातील शेतकऱ्यांना झाला. या शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले आल्याने उत्पन्नदेखील चांगले मिळेल अशी शेतकºयांंना आशा होती.कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे टमाटे, भेंडी, मिरची, वांगे, चवळी, गवार यासोबतच कलिंगडला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. झालेला खर्चदेखील निघत नसल्याने मिळेल त्या भावात भाजीपाला विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी अशोक पाटील, प्रशांत गायकवाड, लक्ष्मण पाटील व अण्णा पाटील यांचे म्हणणे आहे.या भागातील शेतकरी भुसावळ व जळगाव येथील मार्केटला विक्री करतात. लॉकडाऊनमुळे भुसावळ बाजार बंद असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.व्यापारी शेतकºयांकडून मातीमोल भावाने माल खरेदी करुन बाजारात चढ्या दराने विकत असल्याचे चित्र आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दाबला गेला असून, यंदा कोरोनामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे.कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी व्यापाºयांना मातीमोल भावात विकण्यापेक्षा शहरात जाऊन विक्री करीत आहेत.टमाटे लागवडीवर प्रति एकर ३० ते ४० हजार खर्च आला. बाजारात भाजी विक्रेते ५० ते १०० रुपये कॅरेटने मागतात. यात मजुरीचाही खर्च निघत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयास शासनाने मदतीचा हात दिला तरच तो जगू शकेल.-अशोक कृष्णा पाटील, शेतकरी, केकतनिंभोरे, ता.जामनेर

टॅग्स :vegetableभाज्याJamnerजामनेर