शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

जळगावच्या बाजारपेठेत मागणी वाढल्याने डाळींसह धान्याच्या भावात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:32 IST

कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव तीन आठवड्यापासून वाढत आहे

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्याबाजारपेठेमध्ये डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. डाळींची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सलग तिसऱ्या आठवड्यात डाळींच्या भावात वाढ झाली आहे. तांदूळ स्थिर असल्याने तेवढा दिलासा असल्याचे मानले जात आहे. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव तीन आठवड्यापासून वाढत आहे. यामध्ये ऐन उडीद, मुगाची आवक असणाºया काळातच उडीद, मूग तसेच डाळींमध्ये व ज्वारी, बाजरींच्या भावात वाढ सुरू आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत आहे. या आठवड्यात तर गव्हाचेही भाव वाढर्ले असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ७४०० ते ७८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही वाढ होऊन ती ६४०० ते ६८०० रुपयांवरून ६५०० ते ६९०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्यात ६२०० रुपये प्रती क्विंटलवर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६५०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ६००० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवरून ६६०० ते ७००० रुपये प्रती क्विंटल झाले आहे.चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. तसेच चांगल्या दर्जाच्या उडिदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.गव्हाच्या भावातही वाढअनेक ग्राहक आपल्या घरात सहा महिन्यांसाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे उन्हाळ््यानंतर आता पुन्हा दिवाळीच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात गव्हाचे भाव स्थिर आहेत. मात्र या आठवड्यात त्यात वाढ होऊन १४७ गहू २५५० ते २६५० रुपयांवरून २६५० ते २७५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल, चंदोसीचे भाव ३८५० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.ज्वारीचे भाव २००० ते २३०० रुपये प्रती क्विंटल झाले असून बाजरी २३०० रुपये प्रती क्विंटल, दादर ३००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.तांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव स्थिर आहेत.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव