शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:41 IST

प्राथमिक अंदाज : अहवाल सादर; जामनेर, चाळीसगाव, चोपड्यात सर्वाधिक फटका

जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ५ लाख ५ हजार ८७७ शेतकऱ्यांचे ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी व शासनास सादर केला आहे. सर्वाधिक फटका जामनेर, चाळीसगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही अधिक म्हणजेच सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. २१ ते २९आॅक्टोबर या कालावधीत तर संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिवाळीच्या सुट््यांमुळे त्यात अडचण निर्माण झाली होती.अखेर बुधवारपासून पंचनामे सुरू झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवालही कृषी विभागाने सादर केला आहे.सर्वात कमी नुकसान रावेरमध्येतर सर्वात कमी नुकसान रावेर व बोदवड तालुक्यात झाले आहे. रावेर तालुक्यातील १२० गावांमधील १६ हजार ८३७ शेतकºयांचे १५ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर बोदवड तालुक्यात ५२ गावांमधील १७ हजार ४५६ शेतकºयांचे १८ हजार ३७१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

कोरडवाहूचे ४ लाख ६१ हजार हेक्टरचे नुकसान४जिल्ह्यातील कोरडवाहू पिकांचे ४ लाख ६१ हजार १५९ हेक्टरचे तर बागायतीचे १ लाख ३६ हजार ८०४ हेक्टरचे व बहुवार्षिक पिकांचे १८६७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कोरडवाहू मध्ये खरीप ज्वारी ३८ हजार २८८ हेक्टर, कापूस ३ लाख १७ हजार ८९३ हेक्टर, मका ७७ हजार ३५६ हेक्टर, बाजरी ८ हजार ७६९ हेक्टर, सोयाबीन १७ हजार १०१ हेक्टर, तूर १११४ हेक्टर, तीळ ३ हेक्टर, भुईमूग ३०५ हेक्टर तर इतर पिके ३३० हेक्टर, बागायती पिकांपैकी चार पिके २३० हेक्टर, कापूस १ लाख २३ हजार ९८६ हेक्टर, ऊस ११७६ हेक्टर, भाजीपाला २२३३ हेक्टर, पपई २९९ हेक्टर, कांदा ३२८५ हेक्टर, केळी ५५९५ हेक्टर तर बहुवार्षिक पिके- १८६७ हेक्टरचा समावेश असल्याची माहिती मिळाली.जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील एकूण ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक ८५ हजार १६६ हेक्टरचे नुकसान जामनेर तालुक्यात झाले आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव तालुक्यात ७७ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव