शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाला घरातील संकट मानून 'मिशन मोड'वर काम करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:13 IST

टँकरने पाणीपुरवठा खरे नाही

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनांची बिले शासन भरणारदर आठवड्याला आढावा बैठक

जळगाव : राज्यासमोर दुष्काळाचे संकट असून अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत. फक्त पाणी या विषयात आपण कमी पडायला नको. लोकांना आणि जनावरांना पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ शकलो तर दुष्काळ फार कठीण ठरणार नाही. त्यामुळे दुष्काळाला आपल्या घरातील संकट मानून ‘मिशन मोड’वर काम करा, अशा सूचना महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाºयांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दुपारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाºया उपाययोजनांची अधिकाºयांकडून माहिती घेत आवश्यक त्या सूचनादेखील दिल्या.पाणी योजनांवर कधी काम सुरू करणार?दुष्काळी परिस्थितीत टँकरचे अधिकार प्रांताधिकाºयांना देण्याबाबतचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २१ टँकर सुरू आहेत. त्याऐवजी संबंधित गावांना पर्यायी उपाययोजना म्हणून पाईपलाईन टाकण्यावर भर द्या. त्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून मंजुरी घेऊन निविदा काढा, असे आदेशही त्यांनी दिले. जिल्ह्यात तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांसाठी दोन प्रस्ताव आले असल्याचे अधिकाºयांनी सांगितल्यावर त्यांचे काम कधी सुरू करणार असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला.टँकरने पाणीपुरवठा खरे नाहीजिल्ह्यात अद्यापही २१ टँकर का सुरू आहे, असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित करीत त्या ठिकाणी पर्यायी योजनांची तत्काळ उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या. टँकरने पाणीपुरवठा करणे काही खरे नाही असेही ते म्हणाले.टँकरने पाणीपुरवठा करताना जादा फेºया दाखविल्या जातात, त्यामुळे ते काही खरे नाही, अशा शब्दात टँकरच्या पाणीपुरवठ्याबाबत महसूल व पालकमंत्र्यांनीच शंका उपस्थित केली.राज्याचा मंत्री म्हणून विनंती करतोपाणी पुरवठ्याबाबत प्रस्ताव आल्यानंतर एक महिना अगोदर उपाययोजना हाती घेतल्या जातात, अशी माहिती जि.प. अधिकारी देत असताना जानेवारी ते मार्च दरम्यान दुष्काळ तीव्र होणार असला तरी तुम्ही आतापासूनच लक्ष देणे आवश्यक आहे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जि.प. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. राज्याच्या एक मंत्री म्हणून तुम्हाला विनंती करतो, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या.चारा लावण्यासाठी मी येतोगुरांच्या चाºयासाठी चारा लागवड करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाºयांनी सांगितले असता चारा लागवडीसाठी मी येतो, असे उत्तर पालकमंत्र्यांनी दिले व चारा लागवड करण्याचे गांभीर्य अधिकाºयांच्या लक्षात आणून दिले.पाणीपुरवठा योजनांची बिले शासन भरणारवीज पुरवठ्याअभावी अनेक पाणी योजना बंद आहेत. या योजनांच्या थकीत बिलाच्या ५ टक्के रक्कम राज्य शासनाचा मदत व पुनर्वसन विभाग भरणार आहे. त्याचबरोबर दुष्काळाच्या कालावधीतील या योजनांचे आठ महिन्यांचे वीजबीलही शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे वीज वितरण कंपनीने वीज बिलाअभावी पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. या निर्णयाचा लाभ जिल्'ातील बोदवड तालुक्यातील ८० गावे व आडगाव-कासोदासह १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होणार असल्यामुळे या गावांचे पिण्याच्या पाण्याचे संकट टळणार आहे.जिल्ह्यातील १६ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेशक्न वीज बिल थकबाकीमुळे खंडित करण्यात आले आहे. या सर्व योजनांच्या वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम एकत्रित करून त्यांचे वीज पुरवठा पूर्ववत करा. बोदवड व कासोदा-आडगाव या दोन पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा सोमवारपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. यात शनिवार-रविवारी संपूर्ण नियोजन करा व सोमवारी मला कळवा, असेही पालकमंत्र्यांनी जिल्ह्याधिकाºयांना सूचित केले.दर आठवड्याला आढावा बैठकदुष्काळावर मात करण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, वनविभाग, कृषी विभाग तसेच इतर विभागाच्या अधिकाºयांची आढावा बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या.सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहनजळगाव सेवेसाठी प्रसिद्ध असल्याने दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध सेवाभावी संस्था, संघटना, कंपन्या, बँकांना मदतीचे आवाहन केले. दुष्काळी भागात चारा छावण्या उभारणे, विहीर-कूपनलिकांसाठी आर्थिक मदत, कूपनलिका करून देणे अशा प्रकारची मदत केल्यास शासकीय यंत्रणेलादिलासामिळेल,असेही ते म्हणाले.महावितरणच्या अधिकाºयांची बैठकीला दांडीपाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याविषयी निर्णय झाला असल्याने त्याबाबत सूचना देण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांची विचारणा केली असता एकही अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याचे लक्षात आले. त्या वेळी जिल्हाधिकाºयांनीही अधीक्षक अभियंता फारुक शेख कोठे आहे, असा सवाल केला, मात्र काहीच उत्तर मिळाले नाही.सभागृह, माईकच्या स्थितीबाबत जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावेपाणीपुरवठ्याविषयी अधिकारी माहिती देत असताना व्यवस्थित आवाज येत नसल्याने सभागृह, माईक या बाबत जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, असे पालकमंत्री बैठकीदरम्यान म्हणाले.प्रत्येक अधिकाºयाने भ्रमणध्वनी सुरू ठेवावेदुष्काळी स्थितीबाबत प्रत्येक अधिकाºयाने गांभीर्य ठेवत काम करा, अशा सूचना देत ज्या तहसील कार्यालयात वाहने नाहीत, तेथे वाहने देऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक अधिकाºयाने आपापले भ्रमणध्वनी सुरू ठेवावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.राज्यातील ८७ लाख शेतकºयांना होणार लाभराज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे ७५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्यातील ८७ लाख शेतकºयांनी पीक विमा काढला असून त्यांना यामुळे मदत मिळणार आहे. तथापी सध्याची टंचाई परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.शेतकºयांना चारा उपलब्ध करुन देण्याचे नियोजनजिल्ह्यातील पशुधनास चाºयाची टंचाई भासू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग व वन विभागामार्फत ५ हजार हेक्टरवर चारा लावण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यातआले. हा चारा शेतकºयांना शासनामार्फत उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील १२४१३ शेतकºयांना २५८०० किलो चारा बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कृषि विभागांनेही २७ हजार शेतकºयांना बियाणांचे वाटप केल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यात चारा छावण्यांची गरज भासल्यास त्याची मागणी नोंदवावी.शेतपाणंद रस्त्यांची कामे प्राधान्यानेदुष्काळी परिस्थितीमध्ये मागेल त्याच्या हाताला काम देण्यासाठी शेतपाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. सध्या जिल्ह्यात १३०६ कामे सुरु असून या कामांवर ६७६४ मजूर काम करीत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.एरंडोल व यावल शहराबरोबर जिल्ह्यात कुठल्याही गावाला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविल्यास त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे सांगून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, उप वनसंरक्षक, जळगाव व यावल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महावितरणचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्येक सोमवारी बैठक घेऊन जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना दिल्यात. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दररोज किमान ३ गावांना भेटी देऊन टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. बैठकीस विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव