शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी पाहणी समिती जळगाव जिल्ह्यात असतानाच कर्ज बाजारी शेतकऱ्याने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:30 IST

जळगाव : डोक्यावर कर्जाचा डोंगर व शेतीतून पुरेसे उत्पन्न निघत नसल्याने नैराश्य ओढावलेल्या प्रमोद पुंडलिक साळुंखे (४०, रा. शेलवड, ...

जळगाव : डोक्यावर कर्जाचा डोंगर व शेतीतून पुरेसे उत्पन्न निघत नसल्याने नैराश्य ओढावलेल्या प्रमोद पुंडलिक साळुंखे (४०, रा. शेलवड, ता. बोदवड) या कर्जबाजारी शेतकºयाने विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेली केंद्रीय पाहणी समिती जिल्ह्यात असतानाच ही घटना घडल्याने यावरूनच जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात येते.प्रमोद साळुंखे यांची शेलवड येथे ८ एकर शेती असून त्यात त्यांनी या वर्षी मका लावला होता. त्याची काढणीदेखील झाली. मात्र पुरेसे उत्पन्न आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून असाच प्रकार घडत असल्याने साळुंखे यांच्यावर कर्जाचा बोझा वाढत गेला. हे कर्ज कसे फिटणार या विवंचनेत ते सतत राहत असून गुरुवारी दुपारी शेतात गेले व तेथे त्यांनी विष प्राशन केले, अशी माहिती साळुंखे यांच्या नातेवाईकांनी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘लोकमत’शी बोलताना दिली.शेतात ते खाली पडलेले दिसल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना तेथे धाव घेत साळुंखे यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.बाभूळवाडीच्या तरुणानेही घेतले विषदुसºया एका घटनेत धुळे जिल्ह्यातील बाभूळवाडी येथील समाधान राजेंद्र पाटील (३०) या तरुणानेदेखील विष प्राशन केले. त्यालादेखील जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव