शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

महामार्ग चौपदरीकरणाच्या ‘डिझाईन’ला मंजुरी मिळणे बाकी असल्याने भूमीपूजनात सावधगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 10:54 IST

भूमीपूजनाचा मुहूर्तही हुकला

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विविध अडथळ््यांची शर्यत करीत अखेर मंजुरी मिळून निविदा निघालेल्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३च्या (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६) शहरातील ८ किमी लांबीच्या चौपदरीकरण कामाच्या १९ जुलैचा भूमीपूजनाचाही मुहूर्त टळला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते हे भूमीपूजन होणार होते, मात्र जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक व निवेदन देणाऱ्यांची संख्या पाहता पालकमंत्र्यांना वेळच मिळाला नसल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र या कामाच्या डिझाईनला अद्याप मंजुरी मिळणे बाकी असल्याने विनाकारण घाई करणे योग्य ठरणार नाही, यामुळे सावधगिरी बाळगली गेली असल्याचेही सांगितले जात आहे.शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)चे चौपदरीकरण तसेच समांतर रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. दररोज अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले. त्यामुळे यासाठी अनेक आंदोलने झाली. अनेक वेळा यासाठी केवळ आश्वासनावर बोळवण केली गेली. अखेर फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू झाली व आलेल्या निविदांपैकी गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले. यात कंपनीचा करारही झाला.त्यामुळे चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला. शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग होणार आहेत.या कामाचे १९ जुलै रोजी आकाशवाणी चौकात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते भूमीपूजन करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विविध अडथळे येणाºया या कामाचे भूमीपूजनही टळले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते हे भूमीपूजन होणार होते तरी या ठिकाणी कोणी फिरकलेही नाही. याच दिवशी जिल्हा नियोजन विकास समितीची दुपारी १ वाजता गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. सोबतच पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या विविध संघटना व निवेदन देणाºयांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्र्यांना भूमीपूजनासाठी वेळच मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.‘डिझाईन’ला मंजुरी मिळणे बाकीकंपनीशी करार झाला असला तरी या कामाच्या डिझाईनला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. हैद्राबाद येथे हे डिझाईन मंजुरीसाठी पाठविले आहे. मात्र त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आठवडाभरात या डिझाईनला मंजुरीदेखील मिळून जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.घाई टाळली१९ रोजी भूमीपूजनाचे ठरविण्यात आल्यानंतर शहरवासीयांचा रोष शमविण्यासाठी भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप होण्यासह तसे वृत्तही ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यात आता डिजाईनला मंजुरी मिळणे बाकी असल्याने विनाकारण घाई करणे योग्य होणार नाही, यामुळे हे भूमीपूजन करण्यात सावधगिरी बाळगली गेल्याचे सांगितले जात आहे.कामामुळे दिलासाया कामाचे भूमीपूजन झाले नसले तरी कंपनीशी करार झाल्यानंतर कंपनीने खोटेनगरपासून या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या साफसफाई व इतर कामे केले जात आहे. त्यामुळे एकदाचे काम सुरू झाले तेवढा मात्र शहरवासीयांना दिलासा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव