शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या उदासीनतेमुळे जळगावात रुग्णांची फिरफीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:15 IST

एकाच रुग्णालयात प्रसूतीची सोय

ठळक मुद्देअनास्था, मोठी जागा असताना केवळ २० खाटांची व्यवस्था

विजयकुमार सैतवालजळगाव : कर्मचाऱ्यांची कमतरता, इमारतींची दुरवस्था, सुट्टीच्या दिवशी रुग्णवाहिकेचा चालक नसणे अशा बिकट परिस्थितीत मनपाच्या रुग्णालयात रुग्णसेवा सुरूअसून त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचे चित्र मनपाच्या अनास्थेमुळे निर्माण झाले आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे केवळ एका वैद्यकीय अधिकाºयावर रुग्णालयाची मदार असून सुट्टीच्या दिवशी तर ‘इमर्जन्सी’ असली तरच डॉक्टर उपलब्ध होत असल्याचे अनुभव रुग्णांना येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या रुग्णालयांना विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. त्यात सुधारणा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस हाल वाढत आहे. चेतनदास रुग्णालयातील प्रसूतीची सुविधाही बंद केल्याने रुग्णांना शिवाजीनगरपर्यंत फेरा पडत आहे.प्रसुतीची व्यवस्था नसल्याने हालसिंधी कॉलनी भागात असलेल्या चेतनदास मेहता रुग्णालयात पूर्वीपासून असलेली प्रसूतीची सोय वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे बंद केली आहे. या रुग्णालयात शहरातील विविध भागांसह बाहेर गावाहून येणाºया रुग्णांनाही मोठा आधार व्हायचा. मात्र मनपाच्या अनास्थेमुळे ही सेवा बंद पडली. तांबापुरा, मेहरुण परिसर, सिंधी कॉलनी या भागातील रहिवाशांना सोयीच्या असलेले हे रुग्णालय सोडून आता शिवाजीनगरपर्यंत फेºया माराव्या लागत आहे.‘सिव्हील’वरील ताण कमी होईलएकीकडे जिल्हा रुग्णालयात प्रसूत महिलांसाठी जागा अपूर्ण पडत असताना दुसरीकडे मनपाच्या रुग्णालयात जागा धूळखात पडून असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी वाढीव खाटा उपलब्ध करून दिल्यास जिल्हा रुग्णालयातील ताणही कमी होईल व रुग्णांचीही गैरसोय दूर होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.डॉक्टरांची वेळ निश्चित नाहीसुट्टीच्या दिवशी या रुग्णालयात पूर्ण वेळ डॉक्टर नसल्याचे अनुभव रुग्णांनी सांगितले. सुट्टी असल्यास एका डॉक्टरची इमर्जन्सी ड्यूटी लावली जाते. ते सकाळी येऊन पाहणी करून जातात व काही गंभीर रुग्ण आल्यास बोलविल्यानंतर रुग्णालयात येतात, अशी माहिती मिळाली. सकाळी डॉक्टरांची भेट झाली नाही, संध्याकाळी डॉक्टर किती वाजता येतील, या बाबत रुग्णालयात विचारणा केली असता, त्यांची येण्याची निश्चित वेळ नसल्याचे उत्तर मिळाले. पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिकाºयांच्या खोलीला कुलूप असल्याचे दिसून आले. तेथे केवळ परिचारिका व इतर दोन महिला कामावर असल्याचे दिसून आले.डी.बी. जैन रुग्णालयातील जागेचा उपयोग करावाछत्रपती शाहू महाराज रुग्णालय एका संस्थेने चालविण्यास घेतल्याने मनपाच्या रुग्णालयातील प्रसूतीची सोय शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालयात करण्यात आली आहे. या रुग्णालयात मोठी जागा असतानाही केवळ २० खाटांचीच येथे सोय आहे. पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नसल्याने खाटा वाढविल्यास अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे खाटा वाढविल्या जात नाही व एवढी मोठा जागा केवळ रिकामी पडून आहे. या रुग्णालयात प्रवेश करताच बाजूला असलेली मोठी खोली कुलूप लावून बंद करून ठेवलेली दिसून येते.सुट्टीच्या दिवशी ओपीडी सुरु ठेवामनपाच्या चेतनदास मेहता व नानीबाई अग्रवाल या रुग्णालयांचीही पाहणी केली असता तेथे केवळ बाह्य रुग्ण तपासणीची (ओपीडी) सोय असल्याने सुट्टीच्या दिवशी ते बंद असतात. रविवारी त्यांना कुलूप लावलेले असल्याचे दिसून आले. सुट्टी असली तरी रुग्णांसाठी बाह्यरुग्ण तपासणीची सोय सुरू ठेवल्यास या भागातील रुग्णांना आधार होतो. अन्यथा जिल्हा रुग्णालयात या भागातील रुग्णांना धाव घ्यावी लागते. याची दखल घेऊन सुट्टीच्या दिवशीही येथे ओपीडी सुरू करण्याची मागणी या भागातील रहिवाशांची आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव