शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाहतुकदारांच्या संपामुळे जळगावातील दाणाबाजारात आवक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:50 IST

परराज्यातून माल येईना

ठळक मुद्देजळगावात हमाल बांधव अडचणीत५०० वाहतूकदार सहभागी

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यासांठी देशभरात मालवाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे, दररोज दाणाबाजारात मोठ्या प्रमाणावर बाहेरुन येणाऱ्या मालाची आवक ठप्प झाली आहे. परिणामी संपाचा सर्वाधिक परिणाम हमाल बांधवाच्या रोजगारावर झाला असून, ट्रान्सपोर्टनगरातील सुमारे २५० ते ३०० हमाल बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.५०० वाहतूकदार सहभागीडिझेलच्या वाढलेल्या किंमती, ई-वे बिल मधील जाचक अटी व इतर मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्लीतर्फे २० जुलै पासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जळगाव शहरातील ३०० माल वाहतूकदार व इतर तालुक्यांमधील २०० असे एकूण ५०० माल वाहतूकदार सहभागी झाले आहेत. देशभरात हा संप सुरु असल्याने, दाणा बाजारातील विविध व्यापाºयांचा राजस्थान, गुजराथ, पंजाब, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या भागातून दररोज १५ ते २० ट्रकभरुन माल येत असतो. या मालाची आवक पूर्णत: ठप्प झाली आहे.सध्या स्थितीला काही व्यापाºयांकडे दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच वस्तूंचा साठा आहे. जर संप अशाच प्रकारे लांबत राहिल्यास, मालाचा तुटवडा जाणवायला सुरुवात होईल.हमाल बांधवांचा तुटपूंजा रोजगारही बुडालादाणा बाजारासह ट्रान्सपोर्टनगरात बाहेरुन येणाºया मालाची वाहतूक करणारे सुमारे २५० ते ३०० हमाल बांधव आहेत. दररोज एका हमालाला सायंकाळपर्यंत २०० ते ३०० रुपये हमाली मिळते. या तुटपुंज्या हमालीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, चार दिवसांपासून मालवाहतूकदारांच्या बेमुदत संपाचा सर्वाधिक परिणाम हमाल बांधवावर होत असून, त्यांचा तुटपूंजा रोजगारही बुडत आहे. दररोज सकाळपासूनच हमाल बांधव या ठिकाणी येऊन, संप मिटण्याची वाट पाहत आहेत.माल वाहतूकदारांच्या संपामुळे परराज्यातून येणाºया मालाची आवक पूर्णत: ठप्प आहे. आजबाजूच्या जिल्हयांमधूनच मालाची आवक सुुरु आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात संप मिटणे गरजेचे आहे.अन्यथा मालाचा तुटवडा जाणवायला सुरुवात होईल.-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन.युनियनच्या पदाधिकाºयांची नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक झाली.त्यात मात्र मागण्या संदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे.-पप्पू बग्गा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव