शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे सुवर्णनगरीत ‘गुरुपुष्यामृत योग’ची खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:12 IST

सराफ बाजारात शुकशुकाट

ठळक मुद्दे५ कोटींची उलाढाल थांबलीग्राहक पोहचलेच नाही

विजयकुमार सैतवालजळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे सराफ बाजारही बंद राहिल्याने ‘गुरुपुष्मामृत योग’वर होणारी सोने खरेदी देखील होऊ शकली नाही. त्यामुळे या मुहूर्तावर अपेक्षित असलेली ४ ते ५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच जळगावातील सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडली नव्हती. त्यानंतर हळूहळू काही दुकाने सुरू होऊ लागली. मात्र काहीच वेळात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली.मुहूर्त बारगळलासुवर्ण खरेदीसाठी अत्यंत महत्त्व असलेला गुरुपुष्यामृत योग गुरुवारी आला होता. या योगावर अनेक जण सोने खरेदी करीत मुहूर्त साधत असतात. त्यामुळे गुरुवारी ४ ते ५ कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा होती. मात्र दुकानेच बंद असल्याने अनेकांना सोने खरेदी करता आली नाही.ग्राहक पोहचलेच नाहीसुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या जळगावात सोने खरेदीसाठी जिल्ह्यासह राज्यभरातून ग्राहक येत असतात. मात्र बंदमुळे बाहेर गावाहून येणारे ग्राहक जळगावात पोहचलेच नाही. त्यामुळे सुवर्णबाजारात शुकशुकाट होता.विवाह मुहूर्त नसणे व शेतकरीही शेती कामात व्यस्त असल्याने एरव्ही या दिवसात सराफ बाजारात उलाढाल कमी झालेली असते. त्यात गुरुपुष्मामृत योग आल्याने त्यानिमित्ताने उलाढाल वाढण्याची अपेक्षा होती. मात्र बंदमुळे खरेदीच टळल्याचे दिसून आले.गुरुपुष्यामृत योगावर ४ ते ५ कोटींची उलाढाल होणे अपेक्षित होती. मात्र बंदमुळे दुकाने बंद राहिल्याने सराफ बाजारातील सर्व व्यवहार ठप्प झाले.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव