शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रमव्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:57 IST

ग्रामसेवक आंदोलनाचा परिणाम : मुख्याध्यापक करणार वित्त आयोगाची कामे

भुसावळ : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक हे गेल्या महिनाभरापासून संपावर गेले असल्यामुळे गावाचा विकास थांबला आहे. एकंदरीत ग्रामव्यवस्थ्वर या आंदोलनाचा परिणाम दिसून येत आहे.तालुक्यातील ग्र्रामपंचायतींची वसुली थांबल्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. ग्रामसेवकांचा संप संपत नसल्यामुळे ग्रामपंचायतींचा व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्पुरता कार्यभार सांभाळण्याचे आदेश पंचायत समितीने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक खडू , फळा व विद्यार्थ्यांचे माध्यान्न भोजन सोडून आता १४व्या वित्त आयोगातील गटारी व रस्त्यांची कामे करवून घेणार आहेत. त्याचप्रमाणे गावातील कर वसुली करून अर्थव्यवस्था सांभाळणार आहेत. ग्रामसेवकांची कामे मुख्याध्यापकांकडे दिल्यामुळे नागरिक चकीत झाले आहेत. याचा परिणाम शाळेवर होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांनी शाळाबाह्य कामे करून नयेत व या कामावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत तायडे यांनी केले आहे.९ आॅगस्टपासून ग्रामसेवक विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारल्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा फटका ग्रामपातळीवर बसला आहे. या आंदोलनाचा विशेष परिणाम गावातील पाणीपुरवठा, आरोग्य, विकास कामे, ग्रामपंचायतींची करवसुली, कर्मचाऱ्यांचे पगार या कामकाजावर झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक हा शासनाच्या वतीने प्रमुख समजला जातो. त्यामुळे ग्रामसेवक नाही तर इतर कर्मचारी काय काम करत असतील? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने ग्रामपंचायतींचे तात्पुरते कामकाज पाहण्यासाठी मुख्याध्यापकांना आदेश दिले. त्यामुळे आता ग्रामसेवकांचे कामकाज मुख्याध्यापक सांभाळणार का? जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गावात वसुली करणार काय? चौदाव्या वित्त आयोगातील गटारी व रस्त्यांची कामे ठेकेदारांकडून करून घेणार काय? सरपंच व मुख्याध्यापकामध्ये समन्वय जुळणार काय?, टक्केवारीचे कसे करणार? आधीच शिक्षक अतिरिक्त कामांमुळे त्रस्त आहेत त्यात आता या जबाबदारीमुळे गाव सांभाळून शाळा सांभाळण्याचे आव्हान स्वीकारणार काय? असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत...