शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावजवळ दोन ट्रकच्या अपघातामुळे महामार्ग सहा तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:44 IST

ओव्हरटेक करताना दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने राष्टÑीय महामार्ग सहा तास ठप्प झाला तर या अपघातात ट्रक चालक राजू चॉँद शेख (३५, रा.पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक) हा चालक जखमी झाला. बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ रविवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे बांभोरीजवळ मध्यरात्री अपघात   ओव्हरटेक करताना दोन ट्रक एकमेकावर धडकल्या  चालक जखमी

जळगाव : ओव्हरटेक करताना दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने महामार्ग सहा तास ठप्प झाला तर या अपघातात ट्रक चालक राजू चॉँद शेख (३५, रा.पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक) हा चालक जखमी झाला. बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ रविवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजू चॉँद शेख हा चालक नशिराबाद येथील कारखान्यातून ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१५ ई.जी.५२५६) सिमेंट भरुन शनिवारी रात्री साडे बारा वाजता निघाला. एक वाजता बांभोरी पुल ओलांडतांना एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन येणाºया एका ट्रकला वाचविल्यानंतर दुसºया ट्रकवर राजू याचा ट्रक धडकला. त्यामुळे दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाले. अपघातात सिमेंटच्या ट्रकच्या कॅबीनचा चुराडा झाला, त्यामुळे चालक राजू याचा एक पाय व एक हात फ्रॅक्चर झाला. याचवेळी दुसरा ट्रकही या ट्रकवर धडकला.यात दोन ट्रकचे नुकसान झाले. दरम्यान, सिमेंटचा ट्रक डी.के.सोमानी यांच्या मालकीचाअसून निफाड येथे सिमेंट घेऊन जात होता. 

अन्य दोन ट्रकचेही नुकसानसुरतकडून कोलकाता येथे जात असलेला ट्रक (क्र.डब्ल्यू.बी.२३.डी.१८६२), पाळधीकडून जळगावकडे जात असलेला ट्रक (क्र.एमएच.१९.झेड.३३५९) आणि सिमेंटने भरलेला ट्रक (क्र.एमएच.१५.इ.जी.५२५६) या एकमेकांवर धडकल्या. मध्यरात्री ट्रक हटविणे जिकरीचे असल्याने पहाटेच्या सुमारास तीन क्रेन मागवून ट्रक रस्त्याच्याकडेला घेण्यात आले. त्यानंतर कुठे वाहतूक सुरळीत झाली.वाहतूक म्हसावदमार्गे वळविलीबांभोरीजवळ अपघात झाल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहतूक लवकर सुरळीत होण्याचे चिन्हे दिसत नसल्याने पोलिसांनी एरंडोलकडून जाणारे काही वाहने म्हसावद, वावडदा, नेरीमार्गे तर जळगावकडून शिरसोली, वावडदा व म्हसावदमार्गे वाहतूक वळविली होती. सकाळी सात वाजेनंतर वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, या अपघातामुळे नोकरदार व कंपनीत जाणाºया कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जळगावात परिक्षेला येणाºया विद्यार्थ्यांचेही हाल झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव