शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात कुंटणखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 23:43 IST

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शहरातील गांधलीपुरा भागात छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या चार महिला व तीन पुरुषांविरुद्ध पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देचार महिला व तीन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखलदोन महिला फरार पाच जणांना अटक

अमळनेर, जि.जळगाव : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शहरातील गांधलीपुरा भागात छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या चार महिला व तीन पुरुषांविरुद्ध पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, दोन महिला फरार आहेत. घटनास्थळी सात पीडित महिला आढळून आल्या. १ रोजी दुपारी दोनला ही कारवाई करण्यात आली.सूत्रांनुसार, शहरात गांधलीपुरा भागात पोलीस चौकीजवळ कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हा शाखेने अचानक धाड टाकली. त्यात दोन महिला व तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. ताहिरा शेष बाबूलाल (रा.मुंबई गल्ली, अमळनेर), फरीदा राजू काझी (रा.जनाधाणी, गांधलीपुरा अमळनेर, मूळ रा. लेबर कॉलनी फेजनुरा, औरंगाबाद) रफिक शेख रशीद काम काजल, अमजद शेष रशीद, बबलू शेख रशीद (रा.गांधलीपुरा) यांना अटक करण्यात आली. हे त्यांच्या फायद्यासाठी घरात महिलांना ठेवून त्यांच्या करवी देहविक्रीचा व्यवसाय करवून कुंटणखाना चालवित असल्याचा आरोप आहे.तर जुलेखा शेख रशीद उर्फ ज्युली सुलतानाची उर्फ भिकी शेख रशीद दोन्ही रा.मुंबई गल्ली गांधलीपुरा, अमळनेर) या दोन महिला फरार आहेतमहिलांकडून देहविक्री करून वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी चार महिला व तीन पुरुषांविरुद्ध विरुध्द स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६,७ सह मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच रफिक शेख रसीद ऊर्फ काजल रा.गांधलीपुरा अमळनेर हा या ठिकाणी लोकांकडून पैसे स्वीकारुन आकड्यावर मिलन मटका जुगाराचा खेळ खेळवित असल्याचे आढळून आले. रफीक शेखकडून ११ हजार १०० रुपये तसेच तीन हजार रुपये किमतीचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बापू गंगाधर रोहोम यांनी सहायक फौजदार विनयकुमार भीमराव देसले, स्वप्नील नाईक, हेकॉ. सुनील पंडित दागोदरे, हे.कॉ.राजेश बाबूलाल मेंढे, अनिल गणपतराव देशमुख, विनोद संभाजी पाटील, धारद बसंत भालेराव, संजय नारायण हिवरकर, सूरज मधुकर पाटील, शेख युनूस शेख रसूल, राहुल जितेंद्रसिंग पाटील, अरुण राभाष राजपत, रणजित अशोक जाधव, दत्तात्रय गिरधर बडगुजर, ललिता विठ्ठल सोनवणे, मीनल श्रीकांत साकळीकर, सविता महेंद्रसिंग परदेशी, छाया सुरेश मराठे, वहिदा रहेमान तहवी, प्रवीण नथ्थू हिवराळे, अशोक युवराज पाटील यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर