अमळनेरात कुंटणखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 11:42 PM2019-12-01T23:42:53+5:302019-12-01T23:43:55+5:30

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शहरातील गांधलीपुरा भागात छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या चार महिला व तीन पुरुषांविरुद्ध पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

 Ducks raid at Amalnaar | अमळनेरात कुंटणखान्यावर धाड

अमळनेरात कुंटणखान्यावर धाड

Next
ठळक मुद्देचार महिला व तीन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखलदोन महिला फरार पाच जणांना अटक

अमळनेर, जि.जळगाव : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शहरातील गांधलीपुरा भागात छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या चार महिला व तीन पुरुषांविरुद्ध पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, दोन महिला फरार आहेत. घटनास्थळी सात पीडित महिला आढळून आल्या. १ रोजी दुपारी दोनला ही कारवाई करण्यात आली.
सूत्रांनुसार, शहरात गांधलीपुरा भागात पोलीस चौकीजवळ कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हा शाखेने अचानक धाड टाकली. त्यात दोन महिला व तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. ताहिरा शेष बाबूलाल (रा.मुंबई गल्ली, अमळनेर), फरीदा राजू काझी (रा.जनाधाणी, गांधलीपुरा अमळनेर, मूळ रा. लेबर कॉलनी फेजनुरा, औरंगाबाद) रफिक शेख रशीद काम काजल, अमजद शेष रशीद, बबलू शेख रशीद (रा.गांधलीपुरा) यांना अटक करण्यात आली. हे त्यांच्या फायद्यासाठी घरात महिलांना ठेवून त्यांच्या करवी देहविक्रीचा व्यवसाय करवून कुंटणखाना चालवित असल्याचा आरोप आहे.
तर जुलेखा शेख रशीद उर्फ ज्युली सुलतानाची उर्फ भिकी शेख रशीद दोन्ही रा.मुंबई गल्ली गांधलीपुरा, अमळनेर) या दोन महिला फरार आहेत
महिलांकडून देहविक्री करून वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी चार महिला व तीन पुरुषांविरुद्ध विरुध्द स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६,७ सह मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच रफिक शेख रसीद ऊर्फ काजल रा.गांधलीपुरा अमळनेर हा या ठिकाणी लोकांकडून पैसे स्वीकारुन आकड्यावर मिलन मटका जुगाराचा खेळ खेळवित असल्याचे आढळून आले. रफीक शेखकडून ११ हजार १०० रुपये तसेच तीन हजार रुपये किमतीचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बापू गंगाधर रोहोम यांनी सहायक फौजदार विनयकुमार भीमराव देसले, स्वप्नील नाईक, हेकॉ. सुनील पंडित दागोदरे, हे.कॉ.राजेश बाबूलाल मेंढे, अनिल गणपतराव देशमुख, विनोद संभाजी पाटील, धारद बसंत भालेराव, संजय नारायण हिवरकर, सूरज मधुकर पाटील, शेख युनूस शेख रसूल, राहुल जितेंद्रसिंग पाटील, अरुण राभाष राजपत, रणजित अशोक जाधव, दत्तात्रय गिरधर बडगुजर, ललिता विठ्ठल सोनवणे, मीनल श्रीकांत साकळीकर, सविता महेंद्रसिंग परदेशी, छाया सुरेश मराठे, वहिदा रहेमान तहवी, प्रवीण नथ्थू हिवराळे, अशोक युवराज पाटील यांनी ही कारवाई केली.

Web Title:  Ducks raid at Amalnaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.