शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

बस चालविताना व्हिडीओ पाहणाऱ्या चालकाचा परवाना रद्द, आरटीओकडून खासगी बस जप्त

By विलास बारी | Updated: October 17, 2023 20:08 IST

समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने मागून ट्रकला धडक दिल्याने १२ जण ठार झाले होते.

जळगाव : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बस चालवित असताना कानात हेडफोन घालून व्हिडीओ पाहत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा चालक जळगाव आरटीओ कार्यालयाने शोधून काढला आहे. पुणे-नागपूर महामार्गावर धावणारी एमएच १९ सीएक्स ५५५२ ही संगितम् ट्रॅव्हलची बस जळगाव आरटीओ यांनी जप्त करीत परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच संबंधित बसचालकाचा परवाना निलंबनाची कारवाई पुणे आरटीओ कार्यालयात सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने मागून ट्रकला धडक दिल्याने १२ जण ठार झाले होते. या घटनेनंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक खासगी बसचालक हा कानात हेडफोन घालून समोर स्टेअरिंगवर मोबाइल ठेवून व्हिडीओ पाहून बस चालवित असल्याचे दिसत आहे.

संगीतम् ट्रॅव्हलची बस जप्तहा व्हिडीओ १५ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बसचा शोध घेतला. ही खासगी बस पुणे-नागपूर महामार्गावर धावणारी संगीतम् ट्रॅव्हलची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्यासह पथकाने ही खासगी बस जप्त केली आहे. तसेच या बसचे परमिट निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

चालकावर पुणे आरटीओ कार्यालयात कारवाईया बसवरील चालक पुणे आरटीओ कार्यालयात हजर झाला आहे. त्याचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच प्रवाशांच्या जिवास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर प्रवासी बस चालविताना व्हिडीओ पाहणाऱ्या बसचा शोध घेण्यात आला. त्यानुसार संगितम् ट्रॅव्हलची बस जप्त केली आहे. चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया पुणे आरटीओ कार्यालयात सुरू आहे.- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव