शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रिक्षाला उडविणाऱ्या कार चालकाला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 13:02 IST

सोनसाखळी लंपास

ठळक मुद्देगोलाणी मार्केटनजीक गोंधळबांभोरीपासून पाठलाग

जळगाव : सुसाट येणाºया कारने महामार्गावर बांभोरी पुलाजवळ रिक्षाला उडविले. त्यानंतर तेथे न थांबता पुन्हा सुसाट वेगाने निघालेल्या या कारचा बांभोरी येथील नागरिकांनी दुचाकीने पाठलाग करुन गोलाणी मार्केटजवळ अडविले. तेथे कारमधून बाहेर काढून चालक राजेंद्र धनराज जैन (वय ५२, रा.दोंडाईचा, ता.शिंदखेडा जि.धुळे) याला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री १०.१५ वाजता गोलाणी मार्केटजवळ घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र जैन हे गुरुवारी दोंडाईचा येथून मेहुणे सुभाष सांखला यांच्याकडे कारने (क्र.एम.एच.१८ ए.जे.९३३२) जळगावला येत असताना बांभोरीजवळ कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर जैन यांनी तेथे न थांबता पुन्हा वेगाने कार शहराकडे आणली. हा प्रकार पाहिल्यानंतर बांभोरी येथील सात ते आठ दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग केला. महामार्गावरुन कार कोर्ट चौकमार्गे गोलाणी मार्केट परिसरात पोहताच दुचाकीस्वारांनी कारला घेरले. दरम्यान, कार इतक्या वेगात होती की, रस्त्यावर अनेक वाहनांना कट मारला, सुदैवाने दुसरा अपघात झाला नाही.जैन यांना कारमधून काढून बेदम मारहाण होत असताना गोलाणी मार्केट परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. या गर्दीत महेंद्र गणेश पाटील (वय ३०, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या पावभाजी विक्रेत्याने जैन यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली. भररस्त्यावर मारहाण व वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनचे प्रितम पाटील व विजयसिंग पाटील यांना घटनेची माहिती दिली. दोघांना घटनास्थळ गाठून जमावाच्या तावडीतून जैन यांना सोडविले व ताब्यात घेतले.बांभोरीपासून पाठलागअंगझडती घेतली असता महेंद्र याच्याजवळ सोनसाखळी आढळून आली. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, बेदरकारपणे वाहन चालविणे व पोलिसाच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला म्हणून जैन यांच्याविरुध्द तर महेंद्र याच्यावरही सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. े

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव