रावेर - ब-हाणपूरकडून सावद्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक (क्र एच आर - ६९ /बी - ५६१६) ने शहरातील ब-हाणपूर जिलेबी सेंटरसमोरून पायी चालत असलेल्या २६ वर्षीय तरुणास पाठीमागून जबर धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली.शहरातील सावदा रोडवर असलेल्या ब-हाणपूर जिलेबी सेंटरसमोरून नागझिरीकडे पायी जात असलेल्या साबीरखान हमीदखान (वय २६) (रा. मदिना कॉलनी, रावेर) या चहा दुकानावरील हातमजुरी करणाºया इसमास ब-हाणपूरकडून सावद्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक (क्र एच आर - ६९ /बी - ५६१६) ने पाठीमागून धडक दिली. यात तो जागीच ठार झाला.याप्रकरणी आसीफखान अमीरखान याच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात ट्रकचालक हाकीमखान जमरूद्दीनखान (रा.मदिना कॉलनी,रावेर) याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
रावेर येथे भरधाव ट्रकने मजुराला उडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 18:37 IST
ब-हाणपूरकडून सावद्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक (क्र एच आर- ६९ /बी - ५६१६) ने शहरातील ब-हाणपूर जिलेबी सेंटरसमोरून पायी चालत असलेल्या २६ वर्षीय तरुणास पाठीमागून जबर धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
रावेर येथे भरधाव ट्रकने मजुराला उडवले
ठळक मुद्देपायी चालणात असताना झाली घटनाशनिवारी पहाटे साडे चार वाजता झाली घटनाट्रकचालकाविरूद्ध रावेर पोलिसात गुन्हा