शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या कारवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न; चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 11:21 IST

गस्त सुरू असताना घडला प्रकार; आरोपी ट्रॅक्टरसह पोलिसांच्या ताब्यात 

अमळनेर : चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला ट्रॅक्टरने धडक देऊन उडवण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज पहाटे खरदे-वासरे दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे.तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव यांना घेऊन तहसीलदारांच्या वाहनातून अवैध गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी गलवाडे जैतपिर परिसरात काल रात्रीपासून गस्त घालत होते. आज पहाटेच्या सुमारास खरदे ते वासरे रस्त्यावर त्यांना समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील एका ट्रॅक्टरच्या चालकाने (भीमराव कैलास वानखेडे, रा. चौबारी) तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या  गाडीचे नुकसान झाले. या प्रकरणी मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर भीमराव वानखेडेविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 353, 279, 427, 379, 188 अंतर्गत शासकीय कामात अडथळा, मालमतेचे नुकसान, चोरी व अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी वानखेडेला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 2 लाख 70 हजार रुपयांचे ट्रॅक्टर, ट्रॉली वाळूसह जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला करत आहेत.