शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नं इतकी मोठी बघा की लोक वेडे म्हणून हसतील-आय.जी. दिघावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 14:14 IST

मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.

अमळनेर : स्वप्न इतकी मोठी बघा की लोकांनी वेडे म्हणून हसले पाहिजे. कारण ध्येयवेडी लोकच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी तालुक्यातील मंगरूळ येथील मुलींच्या मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.मंगरूळ येथील स्व.अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ.अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे नामकरण आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र उदघाटनप्रसंगी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपप्राचार्य डॉ.एस.ओ.माळी, ग.स.बँकेचे माजी चेअरमन झाम्बर पाटील, नौदलाचे चे ग्रुप कॅप्टन अविनाश पाटील, ॲड.सूर्यवंशी, संस्थाचालक जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, संस्थेच्या संस्थापक सुहासिनी पाटील, चेअरमन श्रीकांत पाटील प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.यावेळी अभ्यासिकेस आय.जी.प्रतापराव दिघावकर यांच्यातर्फे एक लाखाची पुस्तके आणि चार संगणक देण्यात आले.ते पुढे म्हणाले की, मी अवघ्या १२०० रुपयात आयजी झालो आहे. सर्व प्रकारची पुस्तके याठिकाणी उपलब्ध असून तलाठी, पोलीसपासून उच्च अधिकारीपर्यंत कोणत्याही परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा मुलींनी लाभ घ्यावा. चेअरमन श्रीकांत पाटील यांनी परिसरातील जास्तीत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. मी सर्वोतोपरी मदतीसाठी तयार आहे, असे आश्वासनही दिले.माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील म्हणाले की, सर्वसामान्य शेतकरी, गरीब विद्यार्थी, मुलींची जाण ठेवून त्यांची प्रगती करण्याचे उत्कृष्ट कार्य एक वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहे हे निश्चित गौरवस्पद आहे. स्मिता वाघ म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांच्या उच्चाटनासाठी दिघावकर यांनी घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे.अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रगती काळे, नंदिनी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी योगेश पाटील, शिक्षक व्ही.ए.पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.कार्यक्रमास उपसरपंच संजय पाटील, हिरालाल पाटील, रामकृष्ण वाणी, किशोर पाटील, विश्वास पाटील, धनराज पाटील, प्रफुल पाटील, वाल्मीक पाटील, संदीप पाटील, चंद्रशेखर पाटील, श्रुती पाटील, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील विद्यार्थी व मंगरूळ ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर