शानभाग विद्यालयात नाट्य कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:42+5:302021-02-05T06:00:42+5:30

४ फेब्रुवारीला प्रवेश फेरी जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतील प्रथम वर्ष एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या रिक्त ...

Drama workshop at Shanbhag Vidyalaya | शानभाग विद्यालयात नाट्य कार्यशाळा

शानभाग विद्यालयात नाट्य कार्यशाळा

४ फेब्रुवारीला प्रवेश फेरी

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतील प्रथम वर्ष एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी ४ फेब्रुवारीला प्रवेश फेरी होणार आहे. यासाठी संस्थास्तरावर २ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांकडून हस्तलिखित अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.

विजय पवार यांचा सत्कार

जळगाव - दिल्ली येथील अरविंदो सोसायटीतर्फे राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षण समितीच्या सभेत त्यांना प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, प्रमिला पाटील, शिक्षणाधिकारी बी.एस. अकलाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Drama workshop at Shanbhag Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.