शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

नाटकाचं शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:44 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी...

कलेचं ज्ञान उपजत असतं. कला ही कोणत्या शाळेत जावून येत नाही. कला ही रक्तात असावी लागते. अशी अनेक विधानं कलेच्या बाबतीत केली जायची व आजही केली जातात व ती काही अंशी खरी आहेत.झडीचे कलेच्या बाबतीत जर काही संवेदनाच नसतील तर त्याच्यात कोठून येणार कलेच्या जाणिवा? पण शेवटी कलेचा संबंध माणसाशी असतो. माणूस हा बुद्धीजीवी असल्याने कोणतीही गोष्ट तो शिकण्यास तयार असतो. मग ते कोणतेही असो. शिकवून दिले जाते ते व शिकून जे मिळते ते ज्ञान. अर्थात कोणतेही ज्ञान मिळवण्यासाठी मनाची तयारी लागते. शिकणाऱ्याची जर शिकण्याची तयारी व क्षमता असेल तर कोणतेही ज्ञान प्राप्त करणे अवघड नाही. कलेच्या प्रांतात शिक्षणाचा वारसा मोठा आहे. यात गुरूशिष्य परंपरेला मोठे स्थान आहे. शिक्षणाच्या जगात कालमानानुसार जे काही क्रांतीकारक बदल झालेत त्याचे पडसाद सर्वदूर उमटलेत. त्यातून कलेचा प्रांत कसा वेगळा राहील? शाळा कॉलेजमधून इतर शिक्षणाबरोबर कलेचे शिक्षण सुरू झाले व त्याला चांगले यश आहे. जवळपास प्रत्येक शिक्षण संस्थेत कलेचे शिक्षण दिले जात आहे. नाट्यकलेचे शिक्षण अभावानेच दिसून येते. संगीत, चित्रकला, नृत्यकला या कलांच्या शिक्षणाचा प्रसार झालेला दिसून येतो पण नाटकाचे तसे नाही. इतर कला व नाटक यात फरक हा आहे की इतर कला या एकल कला आहेत तर नाटक समूहाची कला आहे. यात समूह काम करतो. अनेक प्रकारची तंत्र काम करतात. एकटा नट आपली कला सादर करायची म्हणून संवाद म्हणून दाखवेल, ते अभिनीत करून दाखवेल पण हे म्हणजे नाटक नाही. रंगमंचावर घडणारा किमान दोन व्यक्तींचा संवाद, भोवती अपेक्षित वातावरण, अनुकूल प्रकाश, सुयोग्य संगीत इ. आणि असे अनेक तंत्रातून नाटक प्रकट होत जाते. गायक आपल्या कलेचा रियाज करण्यासाठी तानपुरा घेवून एकट्याने रियाज करू शकतो, चित्रकार हातात ब्रश घेवून रंगाच्या सहाय्याने चित्र काढू शकतो. कवीला कविता स्फुरल्यावर तो कागदावर सहज उमटवतो पण नाटक सादर करायचे म्हणजे या सगळ्याच तंत्राचा कमी-अधिक वापर करून ते सादर करावे लागते. हे सारं सागण्याचा उद्देश असा की नाटकाचे शिक्षण हा तसा खर्चिक विषय आहे. यात नुसता अभिनय शिकवून उपयोगाच नाही. किंवा नुसती थिअरी सांगून भागत नाही तर अभिनय दिग्दर्शनाला साथ लागते ती तंत्र साहित्याची. नुसते साहित्य असून भागत नाही तर त्याला योग्य व परिपूर्ण जागेची आवश्यकता असते. रंगमंचावरची कला शिकायची म्हटल्यावर रंगमंचाची प्रतिकृती ही त्या नाटकाच्या प्रयोग शाळेत आवश्यक आहे. नाटकासाठी नेपथ्य, लाईट्स, रेकॉर्डिंग साहित्य, साऊंड सिस्टीम, रंगभूषेचे साहित्य, वेशभूषा अशा साधनांची गरज या शाळेत लागते. हा सारा खर्चिक प्रकार आहे. काय तर नाटकाचे शिक्षण द्यायचे म्हटले तर खर्चाच्या बाजू अनेक आहेत पण जमेची बाजू ही एकांगी आहे. विद्यार्थ्यांनी दिलेली फी, संस्थेस मिळालेल्या देणग्या. किंवा कार्यक्रमातून मिळालेले उत्पन्न, फार-फार तर शिक्षण संस्थेस अशा विषयांसाठी क्वचितच मिळणारी सरकारी ग्रॅन्ट या पलीकडे जमा नाही. नुसता खूप पैसा, उत्तम इंन्फ्रास्ट्रक्चर, खूप विद्यार्थी असून भागत नाही. तर हा विषय शिकवण्यासाठी तसा डिव्होटेड शिक्षक लागतो. वर्गात खडू, फळा वापरून व्याख्याने देत हे शिक्षण होत नाही नाटक हा भावभावनांचा खेळ आहे व हा खेळ शिकवण्यासाठी त्याला विद्यार्थ्याच्या भावनांशी एकरुप व्हावे लागते, विद्यार्थ्यासोबत तालमीच्या जागेत ा समोर उभे राहून त्याच्या सोबत काम करवून घेतले जाते. नाटक शिकणे यात प्रात्यक्षिकाला महत्त्व आहे. इथं इतकी प्रात्यक्षिकं होतील, सराव होईल तितका विद्यार्थी घडत असतो. विद्यार्थी जितका सराव करेल तितका तो विचक्षण होत जातो. गरज आहे ती विद्यार्थ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शिक्षण देण्याची आणि मग या प्रोसेसमध्ये सातत्याने काम केल्यावर त्याचे फळ म्हणून हातात माणिक मोती गवसायला लागतात. त्या गुरूचे नाव मोठे करणारे कलावंत निर्माण होऊ लागतात.-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव